प्रियांक खर्गेंविरोधात नाशिकमध्ये भाजपचे आंदोलन

नाशिक : पुढारी पुढारी ऑनलाइन डेस्क ; कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे पूत्र प्रियांक खर्गेंच्या विधानाने आता नवा वाद सुरु झाला आहे. सावरकरांचा फोटो विधानसभेत नको असे प्रियांक खर्गे यांनी म्हटले आहे. खर्गे यांच्या या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्र भाजप आक्रमक झाला असून राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकमध्ये याविरोधात भाजपने आंदोलन हाती घेतले असून … The post प्रियांक खर्गेंविरोधात नाशिकमध्ये भाजपचे आंदोलन appeared first on पुढारी.
#image_title

प्रियांक खर्गेंविरोधात नाशिकमध्ये भाजपचे आंदोलन

नाशिक : पुढारी पुढारी ऑनलाइन डेस्क ; कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे पूत्र प्रियांक खर्गेंच्या विधानाने आता नवा वाद सुरु झाला आहे. सावरकरांचा फोटो विधानसभेत नको असे प्रियांक खर्गे यांनी म्हटले आहे. खर्गे यांच्या या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्र भाजप आक्रमक झाला असून राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकमध्ये याविरोधात भाजपने आंदोलन हाती घेतले असून प्रियांक खर्गे यांची प्रतिकात्मक अंतयात्रा भाजपने काढली.
कर्नाटक विधानभवनातून सावरकरांचे तैलचित्र काढण्याची मागणी खर्गे यांनी केली होती. याविरोधात नाशिकमध्ये भाजपने प्रियांक खर्गेची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत आंदोलन सुरु केले आहे. यावेळी राहुल गांधी यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्याविरोधातही भाजप आंदोलकांनी घोषणा दिल्या.  नाशिकच्या रेडक्रॉस सिग्नलवर मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते जमले.  भाजपचे पदाधिकारी ही प्रतिकात्मक यात्रा जवळच असलेल्या कॉंग्रेसभवन जवळ घेऊन जात असताना पोलिसांनी खर्गेंचा प्रतिकात्मक पुतळा आपल्या ताब्यात घेतला. यावेळी पोलिस व कार्यकर्त्यांमध्ये काहीशी झटापट झाल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा :

11 महिन्यांत 4 लाखांवर पासपोर्ट केले वितरित
डोळ्यांच्या थ्रीडी स्कॅनवरून कळणार किडनीची स्थिती

The post प्रियांक खर्गेंविरोधात नाशिकमध्ये भाजपचे आंदोलन appeared first on पुढारी.

नाशिक : पुढारी पुढारी ऑनलाइन डेस्क ; कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे पूत्र प्रियांक खर्गेंच्या विधानाने आता नवा वाद सुरु झाला आहे. सावरकरांचा फोटो विधानसभेत नको असे प्रियांक खर्गे यांनी म्हटले आहे. खर्गे यांच्या या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्र भाजप आक्रमक झाला असून राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकमध्ये याविरोधात भाजपने आंदोलन हाती घेतले असून …

The post प्रियांक खर्गेंविरोधात नाशिकमध्ये भाजपचे आंदोलन appeared first on पुढारी.

Go to Source