धुळे ग्रामीणच्या विकासाची घोडदौड कायम; रस्ते, पुलांच्या कामांसाठी 20 कोटी मंजूर
धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातील तालुक्यातील पुलांच्या व रस्त्यांच्या कामासाठी तब्बल 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यात बोरी नदीवरील धामणगाव आणि मांडळ येथील दोन पुलांच्या कामाचा समावेश आहे.
धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी नेहमीच विकास कामांना प्राधान्य देत मतदार संघातील प्रत्येक गावात विकासाचे काम पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. धुळे तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी रस्ते आणि पुलांच्या कामांना गती देत आवश्यक त्या ठिकाणी पुलांची कामे मंजूर केले, त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ व वाहनधारकांची गैरसोय दूर होत आहे. नागपुर येथे सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या अर्थ संकल्पीय पुरवणी यादीत आ. कुणाल पाटील यांचे विशेष प्रयत्न व शिफारशीनुसार धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील पुल आणि रस्त्यांच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. या कामांसाठी एकूण 20 कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.
या कामांचा समावेश
त्यात धामणगाव खोरदड रस्ता बोरी नदीवर मोठ्या पुलाचे पोचमार्गासह बांधकाम(एकूण रक्कम रु.6 कोटी रु.), मांडळ-होरपाडा रस्ता ग्रामा-73 बोरी नदीवर मोठ्या पुलाचे पोचमार्गासह बांधकाम करणे(एकूण रक्कम रु.6 कोटी 50 लक्ष), हिंगणे ता.धुळे गावाजवळ पुलाचे बांधकाम करणे(एकूण रक्कम रु.1कोटी 50लक्ष), रामनगर ते बुरझड रस्त्याची सुधारणा करणे(एकूण रक्कम रु.3 कोटी), चौगाव ते लोहगड रस्ता सुधारणा करणे(एकूण रक्कम रु.3 कोटी) या कामांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांसह वाहनधारकांची गैरसोय दूर होणार
बोरी नदीवरील धामणगाव आणि मांडळ-होरपाडा पुलांमुळे तसेच इतर मंजुर रस्त्यांमुळे शेतकरी, ग्रामस्थ व वाहनधारकांची गैरसोय दूर होणार असून आ.कुणाल पाटील यांनी मंजुर केलेल्या रस्त्यामुळे धुळे तालुक्यातील रस्ते चकाचक होणार आहेत. आ.कुणाल पाटील यांनी विकासची कामे मंजुर केल्याबद्दल मतदासंघातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.दरम्यान रस्ते व पुलांना मंजुरी मिळवून देत निधीची तरतूद करुन दिल्याबद्दल आ.कुणाल पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार व्यक्त केले आहेत.
हेही वाचा :
Nashik Accident : नाशिक-पुणे महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार
‘पोपट’ मेला, सांगायचं कुणी ?
Raigad Explore : जिजाऊंचे पाचाड-शिवरायांच्या रायगडला गेला का?
The post धुळे ग्रामीणच्या विकासाची घोडदौड कायम; रस्ते, पुलांच्या कामांसाठी 20 कोटी मंजूर appeared first on पुढारी.
धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातील तालुक्यातील पुलांच्या व रस्त्यांच्या कामासाठी तब्बल 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यात बोरी नदीवरील धामणगाव आणि मांडळ येथील दोन पुलांच्या कामाचा समावेश आहे. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी नेहमीच विकास कामांना प्राधान्य देत मतदार संघातील प्रत्येक गावात विकासाचे काम पोहचविण्याचा प्रयत्न केला …
The post धुळे ग्रामीणच्या विकासाची घोडदौड कायम; रस्ते, पुलांच्या कामांसाठी 20 कोटी मंजूर appeared first on पुढारी.