तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर रूग्णालयात, नेमकं काय घडलं?

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) जखमी झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल (दि.८) रात्री ते त्यांच्या एरवल्ली येथील फार्महाऊसमध्ये पडल्याने त्यांना तात्काळ यशोदा रुग्णालयात दाखल केले आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे. (KCR injured Former Telangana CM and BRS chief KCR … The post तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर रूग्णालयात, नेमकं काय घडलं? appeared first on पुढारी.
#image_title

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर रूग्णालयात, नेमकं काय घडलं?

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) जखमी झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल (दि.८) रात्री ते त्यांच्या एरवल्ली येथील फार्महाऊसमध्ये पडल्याने त्यांना तात्काळ यशोदा रुग्णालयात दाखल केले आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे. (KCR injured

Former Telangana CM and BRS chief KCR injured and admitted to Yashoda Hospitals. He fell down in his farmhouse in Erravalli last night. More details awaited: Sources
(file photo) pic.twitter.com/tmQun8MMAs
— ANI (@ANI) December 8, 2023

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे त्यांच्या फार्महाऊसवर पडल्याने ते जखमी झाले आहेत. ते धोतर बांधत असताना ही घटना घडली आहे. यामध्ये त्यांचे हिप बोन फ्रॅक्चर झाल्याने त्यांच्यावर हिप शस्त्रक्रिया करण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान केटी रामाराव, हरीश राव आणि कविता हे रूग्णालयात पोहचले असून, त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत, असे टाईम्स ऑफ इंडिया ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (KCR injured)
तेलंगणा विधानसभा निवडणुकीत बीआरएसच्या नुकत्याच झालेल्या पराभवानंतर ही  घडला आहे. दरम्यान विधानसभेत रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ६४ जागांसह लक्षणीय विजय मिळवला. तर के चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या नेतृत्त्वाखालील बीआरएसला केवळ ३९ जागा मिळाल्या आहेत. दरम्यान के. चंद्रशेखर राव यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली. गजवेल विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले तर कामरेड्डीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. (KCR injured)
हेही वाचा:

आम्हाला बीजेपीची बी टीम म्हणणार्‍या शरद पवारांची आज स्थिती काय? : के. चंद्रशेखर राव
बीआरएसमध्ये या, बाकीचे आम्ही पाहू! : मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव
Danasari Anasuya Seethakka : नक्षली ते मंत्री, जाणून घ्या तेलंगणातील नव्या मंत्री सीताक्का यांचा प्रवास

The post तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर रूग्णालयात, नेमकं काय घडलं? appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) जखमी झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल (दि.८) रात्री ते त्यांच्या एरवल्ली येथील फार्महाऊसमध्ये पडल्याने त्यांना तात्काळ यशोदा रुग्णालयात दाखल केले आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे. (KCR injured Former Telangana CM and BRS chief KCR …

The post तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर रूग्णालयात, नेमकं काय घडलं? appeared first on पुढारी.

Go to Source