जगभरातील चिमुकल्यांमध्ये वाढतो आहे न्यूमोनियाचा धोका
पुढारी ऑनलाईन : सर्दी होणं म्हणजेच व्हायरल इन्फेक्शन होणं हा समज तुमच्या आमच्यामध्ये सामान्यत: रूढ आहे. सध्या थंडीला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेकांना सर्दीचा त्रास होण्याची शक्यता अनेक पटीने वाढते. पण तुम्हाला माहिती आहे का सर्दीचेही दोन प्रकार आहेत त्यापैकी एक व्हायरल आणि दूसरा आहे बॅक्टीरियल. पण सध्या लहान मुलांमध्ये न्यूमोनियाचे प्रमाण वाढत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मुलांमधील वाढता न्यूमोनिया चिंतेच कारण बनू पाहतो आहे. यातील बरेच रुग्ण हे बॅक्टीरियल न्यूमोनियाच्या तडाख्यात सापडले आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया.
न्यूमोनिया म्हणजे काय ?
कोणत्याही व्यक्तीच्या एक किंवा दोन्ही फुफ्फुसांमध्ये संसर्ग होत असेल तर तर तो प्रकार न्यूमोनियाचा असतो. याचे निदान ब्लड टेस्ट आणि एक्स रेच्या मदतीने केले जाते.
न्यूमोनियाची लक्षणे कोणती ?
• खोकला
• ताप
• सर्दी
• अंगदुखी
• थुंकीचा रंग
• भूक न लागणे
प्रकार कोणते ?
सर्दीप्रमाणेच याचेही दोन प्रकार आहेत 1. व्हायरल 2. बॅक्टीरियल
व्हायरल न्यूमोनिया म्हणजे काय ?
फुफ्फुसांना होणारे व्हायरल संक्रमण या वर्गात मोडते. सर्वसाधारण भाषेत आपण याला फ्लू म्हणून ओळखतो.
बॅक्टीरियल न्यूमोनिया म्हणजे काय ?
स्ट्रेप्टोकोकस किंवा न्यूमोकोकस या बॅक्टीरियापासून फुफ्फुसांना होणारा संसर्ग बॅक्टीरियल न्यूमोनियामध्ये येतो.
या दोन्हीमधील फरक कसा ओळखावा ?
बॅक्टीरियलमध्ये कफ आणि ताप जास्त असतो याशिवाय तीव्र स्वरूपाची छातीत दुखणं जाणवू शकतं.
या दोन्हीमध्ये रुग्णांची ऑक्सीजन पातळीकडे विशेष लक्ष द्यावे लागते.
व्हायरल न्यूमोनियामध्ये सुरुवातीला नाक बंद होणं, खोकला, ताप ही लक्षणं दिसून आली.
बॅक्टीरियल मध्ये अनेकदा फुफ्फुसांना सूज येण्याची शक्यता असते.
The post जगभरातील चिमुकल्यांमध्ये वाढतो आहे न्यूमोनियाचा धोका appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन : सर्दी होणं म्हणजेच व्हायरल इन्फेक्शन होणं हा समज तुमच्या आमच्यामध्ये सामान्यत: रूढ आहे. सध्या थंडीला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेकांना सर्दीचा त्रास होण्याची शक्यता अनेक पटीने वाढते. पण तुम्हाला माहिती आहे का सर्दीचेही दोन प्रकार आहेत त्यापैकी एक व्हायरल आणि दूसरा आहे बॅक्टीरियल. पण सध्या लहान मुलांमध्ये न्यूमोनियाचे प्रमाण वाढत आहे. …
The post जगभरातील चिमुकल्यांमध्ये वाढतो आहे न्यूमोनियाचा धोका appeared first on पुढारी.