माढ्यातून पुन्हा विद्यमान खासदारांना संधी ! भाजप प्रदेशाध्यक्षांचे संकेत

पुणे : माढा लोकसभेचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी चांगले काम केले असून येणार्‍या निवडणुकीत ते गतवेळीपेक्षा जास्त मतांनी निवडून येतील, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी पुण्यात व्यक्त केला. तसेच अकलूजच्या मोहिते पाटील घरातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा दावा केला जात असल्याच्या प्रश्नावर मात्र बोलणे टाळत बावनकुळे यांनी विद्यमान खासदारांनाच पसंती दिली. … The post माढ्यातून पुन्हा विद्यमान खासदारांना संधी ! भाजप प्रदेशाध्यक्षांचे संकेत appeared first on पुढारी.
#image_title

माढ्यातून पुन्हा विद्यमान खासदारांना संधी ! भाजप प्रदेशाध्यक्षांचे संकेत

हिरा सरवदे

पुणे : माढा लोकसभेचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी चांगले काम केले असून येणार्‍या निवडणुकीत ते गतवेळीपेक्षा जास्त मतांनी निवडून येतील, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी पुण्यात व्यक्त केला. तसेच अकलूजच्या मोहिते पाटील घरातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा दावा केला जात असल्याच्या प्रश्नावर मात्र बोलणे टाळत बावनकुळे यांनी विद्यमान खासदारांनाच पसंती दिली. त्यामुळे माढ्यामध्ये भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत.
संबंधित बातम्या :

Pune News : अतिरिक्त आयुक्त अ‍ॅक्शन मोडवर; नागपूर चाळीची केली पाहणी
Pune Drugs Case : ललितची येरवडा कारागृहात रवानगी
Pune News : टपाल तिकिटांमधून उलगडला भारतीय वारसा

माढा लोकसभा मतदार संघाची निर्मिती झाल्यानंतर या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी केले. मात्र, मागील निवडणुकीमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्यानंतर मोहिते-पाटील घराणे भाजपमध्ये सामिल झाले. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या माढा लोकसभेसाठी भाजपने फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना रिंगणात उतरवले. तर राष्ट्रवादीने संजय शिंदे यांना उमेदवारी दिली. प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये मोहिते-पाटील यांनी भाजपच्या मागे संपूर्ण शक्ति लावत एकट्या माळशिरस विधानसभा मतदार संघातून निंबाळकर यांना एक लाखाचे मताधिक्य मिळवून दिले.
मात्र, त्यानंतर निंबाळकर आणि मोहिते-पाटील यांच्यात सुप्त राजकीय संघर्ष झाला. मोहिते-पाटील घराण्याचे राजकीय विरोध असलेले माढ्याचे आमदार बबनराव शिंदे व करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्याशी जवळीक साधून निंबाळकर मोहिते-पाटील यांना शह देत असल्याची माढ्यात चर्चा सुरू आहे.
निंबाळकर आणि शिंदे यांच्या जवळकीच्या पार्श्वभूमीवर विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे व भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक सचिव धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिवाळीचा मुहुर्त साधून माढा लोकसभा लढवण्याचे जाहीर केले आहे. निवडणुक लढवण्याच्या दृष्टीने आपण साडेतीन वर्षापासून मतदार संघात संपर्क वाढवून मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे खासदारकीची संधी अपणास मिळणार, असा दावा केला होता. त्यामुळे माढा मतदार संघात भाजप जागा राखण्यासाठी कुणाला संधी देणार? विद्यमान खासदारांना संधी दिली तर मोहिते-पाटील मदत करणार का? मोहिते-पाटील यांना उमेदवारी दिली तर नाईक निंबाळकर काय करणार? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुण्यातील एका कार्यक्रमात गुरुवारी निंबाळकर सहभागी झाले होते. यावेळी दैनिक पुढारीच्या प्रतिनिधीने माढा लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार व मोहिते-पाटील यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्ष आणि आगामी निवडणुकीतील उमेदवार या संदर्भात विचारणा केली. यावेळी बावनकुळे यांनी निंबाळकर यांच्या कामाचे कौतुक करत आगामी निवडणुकीत ते गतवेळीपेक्षा अधिक मताने निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.
बावनकुळे म्हणाले, माढा लोकसभा मतदार संघात निंबाळकर यांनी आजवर जेव्हढी कामे झाली नाहीत, तेव्हढी कामे केली आहेत. देशातील सर्वाधिक कामे केलेल्या दहा खासदारांमध्ये त्यांचा समावेश आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत निंबाळकर मागच्या वेळी पेक्षा अधिक मतांनी विजयी होती, असा विश्वास व्यक्त करत आगामी निवडणुकीत निंबाळकर यांनाच उमेदवारी देण्याचे संकेत दिले. याचवेळी त्यांनी मोहिते-पाटील यांनी उमेदवारीबाबत केलेल्या दाव्यावर मोहिते-पाटील व आम्ही पाहून घेवू, असे म्हणत जास्त बोलणे टाळले. त्यामुळे मोहिते-पाटील व निंबाळकर यांच्यातील संघर्ष आणखी वाढणार की भाजप श्रेष्ठी दोघांपैकी एकाची समजुत काढण्यात यशस्वी होणार, हे पहावे लागणार आहे.
The post माढ्यातून पुन्हा विद्यमान खासदारांना संधी ! भाजप प्रदेशाध्यक्षांचे संकेत appeared first on पुढारी.

पुणे : माढा लोकसभेचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी चांगले काम केले असून येणार्‍या निवडणुकीत ते गतवेळीपेक्षा जास्त मतांनी निवडून येतील, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी पुण्यात व्यक्त केला. तसेच अकलूजच्या मोहिते पाटील घरातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा दावा केला जात असल्याच्या प्रश्नावर मात्र बोलणे टाळत बावनकुळे यांनी विद्यमान खासदारांनाच पसंती दिली. …

The post माढ्यातून पुन्हा विद्यमान खासदारांना संधी ! भाजप प्रदेशाध्यक्षांचे संकेत appeared first on पुढारी.

Go to Source