पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातील कमकुवत संकेत आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री यामुळे आज गुरुवारी (दि.७) शेअर बाजारात गेल्या सात दिवसांतील तेजीला ब्रेक लागला. सेन्सेक्स आज १३२ अंकांनी घसरून ६९,५२१ वर बंद झाला. तर निफ्टी ३६ अंकांच्या घसरणीसह २०,९०१ वर स्थिरावला. (Stock Market Closing Bell)
बँकिंग आणि आयटी सर्वाधिक सर्वाधिक विक्रीचा दबाव दिसून आला. आजच्या ट्रेडिंग सत्रात अस्थिरता दिसून आली. क्षेत्रीय पातळीवर आज संमिश्र कल दिसून आला. ऑटो, हेल्थकेअर प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी, ऑईल आणि गॅस निर्देशांक १ टक्के आणि पॉवर निर्देशांक जवळपास ३ टक्क्यांनी वाढला, तर एफएमसीजी आणि मेटल निर्देशांक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.७ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.३ टक्क्यांनी वाढला.
सेन्सेक्स आज ६९,६९४ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६९,३२० पर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर भारती एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा स्टील, आयटीसी, एलटी, आयसीआयसीआय बँक, एम अँड एम हे शेअर्स घसरले. तर पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, टायटन, एसबीआय, मारुती, इंडसइंड बँक, टीसीएस हे शेअर्स वाढले.
अदानी शेअर्समध्ये सलग चौथ्या दिवशी तेजी, बाजार भांडवल १४.८ लाख कोटींवर
अदानी समूहाच्या शेअर्सनी सलग चौथ्या दिवशी तेजीचा कल कायम ठेवला. यामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल १४.८ लाख कोटींवर पोहोचले. या तेजीत अदानी टोटल गॅसने शेअर्स आघाडीवर होते. या शेअर्सने सुमारे १० टक्क्यांची वाढ नोंदवून १,०५८ रुपयांचा ५२ आठवड्यांच्या उच्चांक गाठला. मार्चनंतर पहिल्यांदाच या शेअर्सने १ हजारचा टप्पा ओलांडला आहे. (Adani Total Gas Share Price)
IDFC First Bank शेअर्स घसरले
द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, बीएसईवर आज झालेल्या व्यवहारात आयडीएफसी फर्स्ट बँकेचे (IDFC First Bank) शेअर्स जवळपास ५ टक्क्यांनी घसरून ८६ रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यानंतर दुपारच्या व्यवहारात ही घसरण कमी होऊन हे शेअर्स ८७.८० रुपयांवर आले. (IDFC First Bank Share Price) एका अहवालानुसार, ग्लोबल प्रायव्हेट इक्विटी फर्म वॉरबर्ग पिंकस ब्लॉक डीलद्वारे आयडीएफसी फर्स्ट बँकेतील १०० दशलक्ष डॉलर किमतीचे हिस्सेदारी विकण्याचा विचार आहे.
स्पाइसजेटचे शेअर्सची रॉकेट भरारी, ‘हे’ ठरले कारण
स्पाइसजेटचे शेअर्स (Spicejet Share Price) आज २० टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये पोहोचले. या शेअर्सने आज १५ महिन्यांचा उच्चांकावर व्यवहार केला. दुपारच्या व्यवहारात हा शेअर्स सुमारे २० टक्क्यांनी वाढून ५२.२९ रुपयांवर पोहोचला. हा शेअर्स ८ रुपयांहून अधिक वधारला आहे. ऑक्टोबर नंतरची एका दिवसातील या शेअर्समध्ये झालेली ही मोठी वाढ आहे. स्पाइसजेट बोर्ड ११ डिसेंबर रोजी इक्विटी शेअर्स आणि कन्व्हर्टेबल सिक्युरिटीजच्या इश्यूद्वारे नवीन भांडवल उभारण्यावर चर्चा करण्यासाठी आणि मान्यता देण्यासाठी बैठक घेईल, अशी माहिती स्पाइसजेट एअरलाइनने एक्स्चेंज फाइलिंगमधून दिली होती. या पार्श्वभूमीवर कंपनीच्या शेअर्सने मोठी उसळी घेतली आहे. (Stock Market Closing Bell)
परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री
एनएसई (NSE) वर उपलब्ध आकडेवारीनुसार, ६ डिसेंबर रोजी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) ७९.८८ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DII) १,३७२.१८ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.
The post ‘सेन्सेक्स’च्या ७ दिवसांच्या तेजीला ब्रेक, निफ्टी २०,९०१ वर बंद, बाजारात आज काय घडलं? appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातील कमकुवत संकेत आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री यामुळे आज गुरुवारी (दि.७) शेअर बाजारात गेल्या सात दिवसांतील तेजीला ब्रेक लागला. सेन्सेक्स आज १३२ अंकांनी घसरून ६९,५२१ वर बंद झाला. तर निफ्टी ३६ अंकांच्या घसरणीसह २०,९०१ वर स्थिरावला. (Stock Market Closing Bell) बँकिंग आणि आयटी सर्वाधिक सर्वाधिक विक्रीचा दबाव दिसून आला. आजच्या ट्रेडिंग …
The post ‘सेन्सेक्स’च्या ७ दिवसांच्या तेजीला ब्रेक, निफ्टी २०,९०१ वर बंद, बाजारात आज काय घडलं? appeared first on पुढारी.