वालचंदनगर कामगारांच्या प्रश्नांवर आज औद्योगिक न्यायालयात सुनावणी

वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा :  वालचंदनगर कंपनीतील कामगारांचा 15 दिवसांपासून संप सुरू आहे. मात्र, अद्यापही कामगारांच्या मागण्यांबाबत तोडगा निघालेला नाही. दरम्यान, संपकरी कामगारांच्या प्रश्नावर गुरुवारी (दि. 7) औद्योगिक न्यायालयात सुनावणी होणार आहे. वालचंदनगर कंपनीकडे कामगारांची सुमारे 7 कोटी 80 लाख रुपयांची थकीत देणी आहेत. ही देणी द्यावीत, या मागणीसाठी कामगार आयएमडी कामगार समन्वय संघाच्या माध्यमातून … The post वालचंदनगर कामगारांच्या प्रश्नांवर आज औद्योगिक न्यायालयात सुनावणी appeared first on पुढारी.
#image_title

वालचंदनगर कामगारांच्या प्रश्नांवर आज औद्योगिक न्यायालयात सुनावणी

वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा :  वालचंदनगर कंपनीतील कामगारांचा 15 दिवसांपासून संप सुरू आहे. मात्र, अद्यापही कामगारांच्या मागण्यांबाबत तोडगा निघालेला नाही. दरम्यान, संपकरी कामगारांच्या प्रश्नावर गुरुवारी (दि. 7) औद्योगिक न्यायालयात सुनावणी होणार आहे. वालचंदनगर कंपनीकडे कामगारांची सुमारे 7 कोटी 80 लाख रुपयांची थकीत देणी आहेत. ही देणी द्यावीत, या मागणीसाठी कामगार आयएमडी कामगार समन्वय संघाच्या माध्यमातून कंपनीशी चर्चा करीत होते. मात्र, कंपनीने कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने 22 नोव्हेंबरपासून कामगारांनी संप केला. संप कालावधीत कंपनी व कामगार संघटनेने औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.
याबाबत आयएमडीचे अध्यक्ष कपिल गायकवाड व जनरल सेक्रेटरी शहाजी दबडे म्हणाले की, कंपनीने तडजोडीचा एक प्रस्ताव दिला. कामगारांनी संप मागे घेतल्यास थकीत देण्यांपैकी 40 टक्के रक्कम आठ दिवसांत व उर्वरित 60 टक्के रक्कम जानेवारी व फेब—ुवारी महिन्यात दोन टप्प्यांत देण्यात येईल. वेतनवाढ करारावर मार्च 2024 नंतर चर्चा करून सोडविण्यात येईल, असे प्रस्तावात म्हटले आहे. मात्र, आम्ही वेतनवाढीचा करार तातडीने करण्याची मागणी केली आहे. सर्व मागण्या मान्य होईपर्यंत कामगार संपावर ठाम आहेत. कंपनीने कामगारांचे तीन पगार व इतर देणी थकविली असताना अधिकार्‍यांचा एकाच वेळी दोन महिन्यांचा पगार जमा केला. मात्र, कामगारांचा एकही पगार जमा केला नसल्याचे सांगितले.
हेही वाचा :

Chennai Floods : चेन्नईतील पूरग्रस्तांना सोनू सूदची अनोखी मदत
शिरूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीची उद्या बैठक

The post वालचंदनगर कामगारांच्या प्रश्नांवर आज औद्योगिक न्यायालयात सुनावणी appeared first on पुढारी.

वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा :  वालचंदनगर कंपनीतील कामगारांचा 15 दिवसांपासून संप सुरू आहे. मात्र, अद्यापही कामगारांच्या मागण्यांबाबत तोडगा निघालेला नाही. दरम्यान, संपकरी कामगारांच्या प्रश्नावर गुरुवारी (दि. 7) औद्योगिक न्यायालयात सुनावणी होणार आहे. वालचंदनगर कंपनीकडे कामगारांची सुमारे 7 कोटी 80 लाख रुपयांची थकीत देणी आहेत. ही देणी द्यावीत, या मागणीसाठी कामगार आयएमडी कामगार समन्वय संघाच्या माध्यमातून …

The post वालचंदनगर कामगारांच्या प्रश्नांवर आज औद्योगिक न्यायालयात सुनावणी appeared first on पुढारी.

Go to Source