मूतखड्याचा त्रास दूर ठेवण्यासाठी ‘ही’ काळजी घ्या

किडनीमध्ये खडे किंवा मूतखडा होणे वेदनादायी असते. असा मूतखडा होण्यापासून रोखण्यासाठी आपल्या काही सवयींमध्ये बदल करण्याची गरज आहे. संबंधित बातम्या  मूतखडा होऊ नये यासाठी ‘हे’ करा घरगुती उपाय मूतखडा व होमिओपॅथिक उपचार | पुढारी stomach pain | पोटदुखीची कारणे आणि उपाय काय? काही टिप्स जाणून घेऊया, ज्याचा वापर करून मूतखडा होण्याची प्रक्रियाच रोखता येईल. मिठाचे … The post मूतखड्याचा त्रास दूर ठेवण्यासाठी ‘ही’ काळजी घ्या appeared first on पुढारी.
#image_title
मूतखड्याचा त्रास दूर ठेवण्यासाठी ‘ही’ काळजी घ्या

डॉ. संतोष काळे

किडनीमध्ये खडे किंवा मूतखडा होणे वेदनादायी असते. असा मूतखडा होण्यापासून रोखण्यासाठी आपल्या काही सवयींमध्ये बदल करण्याची गरज आहे.
संबंधित बातम्या 

मूतखडा होऊ नये यासाठी ‘हे’ करा घरगुती उपाय
मूतखडा व होमिओपॅथिक उपचार | पुढारी
stomach pain | पोटदुखीची कारणे आणि उपाय काय?

काही टिप्स जाणून घेऊया, ज्याचा वापर करून मूतखडा होण्याची प्रक्रियाच रोखता येईल.
मिठाचे प्रमाण
मूतखडा होण्यापासून वाचण्यासाठी आहारात मिठाचा वापर कमी प्रमाणात करणे फायदेशीर आहे. अतिप्रमाणात सोडियमचे सेवन केल्यास युरीनमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण वाढते. त्यामुळे नंतर मूतखडा होण्यास कारणीभूत ठरते. खूप जास्त प्रमाणात सोडियम घेतल्यास शरीरात पाणी कमी होते.
कॅल्शिअमचे प्रमाण
शरीरात कॅल्शिअमच्या कमी प्रमाणामुळे ऑक्सलेटची पातळी घटते. त्यामुळे मूत्रपिंडात खडा होण्याचे कारण असते. त्यासाठी शरीरात कॅल्शिअमचे योग्य प्रमाण असणे गरजेचे असते. त्यासाठी नटस्, सीडस्, सालमन फिश इत्यादींचे सेवन करणे गरजेचे आहे.
प्राणीजन्य प्रथिने
प्राणीजन्य पदार्थांतून मिळणार्‍या प्रथिनांमध्ये पोषक घटकांचे प्रमाण जास्त असते. त्यातून शरीरात युरीक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते. याचा परिणाम मूतखडा निर्माण होण्यास मदत होते.
याखेरीज बोअरवेलच्या पाण्यामधील अतिरिक्त क्षारांमुळेही मूतखड्याचा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे पिण्याचे पाणी स्वच्छ, शुद्ध असेल याकडे लक्ष द्या.
मूतखडा हा अनेक घटकांमुळे तयार होतो. मूतखडा तयार होण्यासाठी जी संयुगे कारणीभूत असतात त्याचे नाव आहे कॅल्शिअम ऑक्सिलेट. म्हणूनच शरीरात ऑक्सिलेटचे प्रमाण कमी करण्यावर भर द्यायला हवा. त्यासाठी चहा, रताळे, बटाटा, पालक, द्राक्षे इत्यादींचे सेवन न करण्याचे पथ्य पाळावे.
The post मूतखड्याचा त्रास दूर ठेवण्यासाठी ‘ही’ काळजी घ्या appeared first on पुढारी.

किडनीमध्ये खडे किंवा मूतखडा होणे वेदनादायी असते. असा मूतखडा होण्यापासून रोखण्यासाठी आपल्या काही सवयींमध्ये बदल करण्याची गरज आहे. संबंधित बातम्या  मूतखडा होऊ नये यासाठी ‘हे’ करा घरगुती उपाय मूतखडा व होमिओपॅथिक उपचार | पुढारी stomach pain | पोटदुखीची कारणे आणि उपाय काय? काही टिप्स जाणून घेऊया, ज्याचा वापर करून मूतखडा होण्याची प्रक्रियाच रोखता येईल. मिठाचे …

The post मूतखड्याचा त्रास दूर ठेवण्यासाठी ‘ही’ काळजी घ्या appeared first on पुढारी.

Go to Source