रशियात १४ वर्षीय मुलीचा वर्गात अंदाधूंद गोळीबार, विद्यार्थी ठार, पाच गंभीर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : रशियामध्‍ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ब्रायन्‍स्‍क येथील एका शाळेत १४ वर्षाच्‍या मुलीने केलेल्‍या गाेळीबारात विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. या गोळीबारानंतर आठवीच्‍या वर्गातील विद्यार्थिनीने स्‍वत:चे जीवनही संपवले, असे वृत्त ‘द मॉस्‍को टाइम्‍स’ने दिले आहे. ( Girl shoots dead classmate ) युक्रेनच्या सीमेपासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या … The post रशियात १४ वर्षीय मुलीचा वर्गात अंदाधूंद गोळीबार, विद्यार्थी ठार, पाच गंभीर appeared first on पुढारी.
#image_title

रशियात १४ वर्षीय मुलीचा वर्गात अंदाधूंद गोळीबार, विद्यार्थी ठार, पाच गंभीर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : रशियामध्‍ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ब्रायन्‍स्‍क येथील एका शाळेत १४ वर्षाच्‍या मुलीने केलेल्‍या गाेळीबारात विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. या गोळीबारानंतर आठवीच्‍या वर्गातील विद्यार्थिनीने स्‍वत:चे जीवनही संपवले, असे वृत्त ‘द मॉस्‍को टाइम्‍स’ने दिले आहे. ( Girl shoots dead classmate )
युक्रेनच्या सीमेपासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रायन्स्क शहरातील एका शाळेत आठवीत शिकणार्‍या मुलीने वर्गात गोळीबार केला. शाळेबाहेर जमलेल्या स्थलांतरितांच्या जमावाचे चित्रीकरण करणाऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितले. गोळीबारात जखमी झालेल्‍या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, हल्ल्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती आरोग्‍य अधिकार्‍यांनी दिली. मुलीच्‍या वडिलांची पोलीस चौकशी करत आहेत.

Investigators said the 14-year-old student who brought a shotgun to school and killed her classmate was among the dead.https://t.co/SYdNafnkBG
— The Moscow Times (@MoscowTimes) December 7, 2023

यापूर्वी रशियामधील काझान आणि पर्म या शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्‍या गोळीबाराने देश हादरला होता. यानंतर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बंदूक नियंत्रण कायद्यांचे पुनरावलोकन करण्याची मागणी केली. तसेच रायफल मिळविण्याचे किमान वय 18 वरून 21 करण्यात आले. तसेच रायफल परवाना देण्‍यापूर्वी मानसिक आरोग्य तपासणी कडक करण्यात आली होती.
The post रशियात १४ वर्षीय मुलीचा वर्गात अंदाधूंद गोळीबार, विद्यार्थी ठार, पाच गंभीर appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : रशियामध्‍ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ब्रायन्‍स्‍क येथील एका शाळेत १४ वर्षाच्‍या मुलीने केलेल्‍या गाेळीबारात विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. या गोळीबारानंतर आठवीच्‍या वर्गातील विद्यार्थिनीने स्‍वत:चे जीवनही संपवले, असे वृत्त ‘द मॉस्‍को टाइम्‍स’ने दिले आहे. ( Girl shoots dead classmate ) युक्रेनच्या सीमेपासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या …

The post रशियात १४ वर्षीय मुलीचा वर्गात अंदाधूंद गोळीबार, विद्यार्थी ठार, पाच गंभीर appeared first on पुढारी.

Go to Source