BMW कार, ५० तोळे सोने, १५ एकर जमिनीसाठी लग्न मोडले, केरळमधील डॉक्टरने जीवन संपवले

पुढारी ऑनलाईन : केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाच्या घरच्यांनी लग्नासाठी हुंडा म्हणून केलेली बीएमडब्ल्यू कार, सोने आणि १५ एकर जमीन देण्याची मागणी पूर्ण न करु शकल्याने एका वैद्यकीय विद्यार्थीनीने जीवन संपवले आहे. तिरुअनंतपूरम वैद्यकीय महाविद्यालयाच्या शस्त्रक्रिया विभागातील पदव्युत्तर शिक्षण घेणारी २६ वर्षीय विद्यार्थिनी शहाना मंगळवारी सकाळी तिच्या भाड्याच्या फ्टॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली … The post BMW कार, ५० तोळे सोने, १५ एकर जमिनीसाठी लग्न मोडले, केरळमधील डॉक्टरने जीवन संपवले appeared first on पुढारी.
#image_title

BMW कार, ५० तोळे सोने, १५ एकर जमिनीसाठी लग्न मोडले, केरळमधील डॉक्टरने जीवन संपवले

पुढारी ऑनलाईन : केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाच्या घरच्यांनी लग्नासाठी हुंडा म्हणून केलेली बीएमडब्ल्यू कार, सोने आणि १५ एकर जमीन देण्याची मागणी पूर्ण न करु शकल्याने एका वैद्यकीय विद्यार्थीनीने जीवन संपवले आहे. तिरुअनंतपूरम वैद्यकीय महाविद्यालयाच्या शस्त्रक्रिया विभागातील पदव्युत्तर शिक्षण घेणारी २६ वर्षीय विद्यार्थिनी शहाना मंगळवारी सकाळी तिच्या भाड्याच्या फ्टॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. तिचे कुटुंब हुंड्याची मागणी पूर्ण करू शकत नसल्यामुळे तिच्या बॉयफ्रेंडने लग्नास नकार दिला होता. यामुळे तिने जीवन संपवल्याचा केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.
तिरुअनंतपूरम वैद्यकीय महाविद्यालयातील एका पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्याच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद करणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालय पोलिसांनी मेडिकल पीजी असोसिएशनचे माजी राज्य अध्यक्ष डॉ. रुवाइज ईए यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि हुंडा बंदी कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
रुवाइज याचे शहाना सोबत लग्न ठरले होते. पण नंतर रुवाइजच्या घरच्यानी हुंडा म्हणून १५० सोने, १५ एकर जमीन आणि बीएमडब्ल्यू कारची मागणी केली. शहानाच्या कुटुंबियांनी आधी ५० तोळे सोने, ५० लाखांची मालमत्ता आणि एक कार देण्याचे मान्य केले होते. मात्र, तिच्या मित्राचे कुटुंबीय यासाठी तयार झाले नाही आणि त्यांनी लग्नाची पुढची बोलणी थांबवली. यामुळे शहाना हिला मोठा धक्का बसला. ती डिप्रेशनमध्ये गेली होती, असे तिच्या कुटुंबियांनी सांगितले.
शहाना सोमवारी शस्त्रक्रिया विभागाच्या आयसीयूमध्ये रात्री ड्युटीवर रुजू होणार होती. मात्र ती त्या दिवशी ड्युटीवर दिसली नाही. एका सहकाऱ्याने तिला फोन केला असता तिने त्याला प्रतिसाद दिला नाही. नंतर जेव्हा तिचे मित्र ती रहात असलेल्या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा त्यांना दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले आणि त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी शहाना फ्लॅटमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. तिला तात्काळ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण, तिला मृत घोषित करण्यात आले.
पोलिसांनी अधिक दिलेल्या माहितीनुसार, तिने भूल देण्याच्या औषधाच्या अधिक डोसचे इंजेक्शन घेऊन आपले जीवन संपवले आहे. शहानाने एक चिठ्ठीही लिहिली आहे. जी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यात लिहिले आहे की, “प्रत्येकाला फक्त पैसे हवे आहेत”.
दरम्यान, शहानाच्या मृत्यू प्रकरणाची केरळ सरकारने गंभीर दखल घेतली आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी बुधवारी महिला व बालविकास विभागाला शहानाच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
हे ही वाचा :

Income Tax Raid : अबब…’आयकर’ने जप्‍त केली तब्‍बल ५० कोटींची राेकड, नोटा मोजणारे मशीन पडले बंद

Crime News : लग्नाच्या आमिषाने महिलेशी शरीरसंबंध

Accident News : कार गेली तब्बल 50 फूट खोल दरीत

The post BMW कार, ५० तोळे सोने, १५ एकर जमिनीसाठी लग्न मोडले, केरळमधील डॉक्टरने जीवन संपवले appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन : केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाच्या घरच्यांनी लग्नासाठी हुंडा म्हणून केलेली बीएमडब्ल्यू कार, सोने आणि १५ एकर जमीन देण्याची मागणी पूर्ण न करु शकल्याने एका वैद्यकीय विद्यार्थीनीने जीवन संपवले आहे. तिरुअनंतपूरम वैद्यकीय महाविद्यालयाच्या शस्त्रक्रिया विभागातील पदव्युत्तर शिक्षण घेणारी २६ वर्षीय विद्यार्थिनी शहाना मंगळवारी सकाळी तिच्या भाड्याच्या फ्टॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली …

The post BMW कार, ५० तोळे सोने, १५ एकर जमिनीसाठी लग्न मोडले, केरळमधील डॉक्टरने जीवन संपवले appeared first on पुढारी.

Go to Source