Crime News : लग्नाच्या आमिषाने महिलेशी शरीरसंबंध
बारामती : पुढारी वृत्तसेवा : विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्या कुटुंबापासून विभक्त करीत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले. याप्रकरणी सूरज राजेंद्र पिसाळ (रा. यदू पाटीलनगर, तांदूळवाडी, बारामती) याच्याविरोधात, तर त्याला साहाय्य केल्याप्रकरणी चित्रा राजेंद्र पिसाळ यांच्यावर बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत तांदूळवाडीत राहणार्या महिलेने फिर्याद दाखल केली. सन 2022 ते 16 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ही घटना घडली. फिर्यादी कुटुंबासह तांदूळवाडीत राहत असताना तिच्या दुकानात आरोपी सूरज हा किराणा माल व अन्य साहित्य घेण्यासाठी येत होता. यातून त्याने तिचा मोबाईल क्रमांक घेतला.
संबंधित बातम्या :
प्रशासनाचा जाच अन् आंदोलनाचा परिणाम ; करंदीतील कंपनी गुजरातला जाणार !
Pune Bangalore Highway Accident : पुणे-बंगळूर महामार्गावर भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक ठार
Assembly Winter Session: ब्रेकिंग : नवाब मलिक सत्ताधारी बाकावर; अजित पवार गटाला पाठिंबा
त्यानंतर तिच्याशी तो फोनवर बोलू लागला. ‘तू मला खूप आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करतो,’ असे त्याने सांगितले. त्यावर ‘माझे लग्न झालेले असून, मला एक मुलगा आहे,’ असे उत्तर फिर्यादीने त्याला देत प्रतिसाद दिला नाही. 16 जानेवारी 2023 रोजी त्याने फोन करून ‘तू आताच्या आता घरी ये, नाहीतर मी जिवाचे बरेवाईट करून घेईन,’ अशी धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी त्याच्या घरी गेली. या वेळी त्याने तिला शीतपेय प्यायला दिले. त्यामुळे फिर्यादीला गुंगी आली. शुद्धीत आल्यावर सूरजने इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीरसंबंध केल्याचे तिला जाणवले. तिने शीतपेयात काय टाकले होते, अशी विचारणा केली असता त्याने दोघांचे मोबाईलमध्ये काढलेले अश्लील फोटो तिला दाखविले. ‘तू माझ्यासोबत लग्न कर, मी तुझ्या मुलाला सांभाळतो,’ असे आश्वासन त्याने दिले. घाबरलेल्या फिर्यादीने हा प्रकार कोणाला सांगितला नाही.
त्यानंतर 15 दिवसांनी सूरजने पुन्हा तिला फोन करीत बारामतीत भेटायला बोलावले. ‘नाही आली, तर अश्लील फोटो सगळीकडे व्हायरल करेन,’ अशी धमकी दिली. फिर्यादीला दुचाकीवरून शहरातील एका लॉजवर नेत तेथे तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वारंवार वेगवेगळ्या लॉजवर तो तिला नेत होता. त्यानंतर लग्न करतो, असे म्हणत त्याने माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजजवळ त्याच्या मावशीकडे तिला व तिच्या मुलाला नेले. तेथे त्याची आई चित्रा त्यांच्यासोबतच राहत होती. दोन महिने त्याने तिला तेथे ठेवले. लग्नाचा विषय काढला की, सूरज व त्याची आई यांच्याकडून हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली जात होती. मुलाला मारण्याची धमकी दिली जात होती.
दरम्यान, ऑक्टोबरमध्ये त्याने तहसील कार्यालयासमोर दोन स्टॅम्प पेपरवर तिच्या बळजबरीने सह्या घेतल्या. माळेगावमधील जाधववस्ती येथे तिला ठेवत तेथेही तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. दि. 17 नोव्हेंबर रोजी तो कामानिमित्त बाहेर चाललो आहे, असे सांगून बाहेर पडला. त्यानंतर तो घरी आला नाही. त्याला फिर्यादीने वारंवार फोन केले. त्याने फोन घेत ‘मी येणार नाही, तुझे तू बघ,’ असे उत्तर तिला दिले. घडलेला प्रकार फिर्यादीने तिच्या मामाला सांगितल्यानंतर याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दाखल केली.
The post Crime News : लग्नाच्या आमिषाने महिलेशी शरीरसंबंध appeared first on पुढारी.
बारामती : पुढारी वृत्तसेवा : विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्या कुटुंबापासून विभक्त करीत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले. याप्रकरणी सूरज राजेंद्र पिसाळ (रा. यदू पाटीलनगर, तांदूळवाडी, बारामती) याच्याविरोधात, तर त्याला साहाय्य केल्याप्रकरणी चित्रा राजेंद्र पिसाळ यांच्यावर बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत तांदूळवाडीत राहणार्या महिलेने फिर्याद दाखल केली. सन …
The post Crime News : लग्नाच्या आमिषाने महिलेशी शरीरसंबंध appeared first on पुढारी.