नाशिक : रस्त्यावर बर्थडे सेलिब्रेशन करणाऱ्यांना पोलिसांकडून चोप
नाशिक : पुढारी वृत्तसेवा– वाढदिवस साजरा करण्यासाठी काही टोळके रस्त्यावरच धांगडधिंगा करीत असतात. ही बाब रोखण्यासाठी शहर पोलिसांनी आता सेलिब्रेशन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे. त्यानुसार चौकात गर्दी जमवून, केक कापून गोंधळ घालणाऱ्यांना काही वेळातच पोलिस ठाण्यात जमा व्हावे लागत आहे. वाढदिवसानिमित्त फटाके फोडणाऱ्यांविरोधात नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल करून दणका दिला आहे.
शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी टवाळखोरांवर कारवाई वाढवण्यात आली आहे. त्यामुळे विनाकारण घोळका करून चौकात बसणाऱ्या, भरधाव वाहने चालवणाऱ्यांसह तरुणी-महिलांची छेड काढणारे व गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रस्त्याच्या मधोमध किंवा कडेला वाढदिवस साजरा करून गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कारगिल चौकात सायंकाळी 5 वाजता 13 जणांनी गर्दी केल्याचे आढळले. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून वाढदिवस साजरा करण्यास आयुक्तालयाने परवानगी नाकारलेली आहे. तरीही टोळक्याने वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न केल्याने सूरज ओमप्रकाश राजपूत (३२), जीव दिघोळे यांच्यासह इतर आठ ते दहा जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे, तर नाशिकरोडच्या खर्जुल मळा परिसरात मध्यरात्री 1 वाजता काही जणांनी जमून फटाके वाजवून वाढदिवस साजरा केला. पोलिसांचे पथक पोहोचल्यानंतरही या टोळक्याची आरडाओरड सुरू होती. त्यामुळे पोलिसांनी शिवाजी गायधनी, शेखर गायधनी, आकाश जारस, भारत सालकर या संशयितांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
प्रतिबंधात्मक कारवाईसाठी फायदा
सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांसह हातगाडीधारक, इतरांविरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत. त्याचप्रमाणे वाढदिवस साजरे करून गोंधळ घालणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलिस कायद्यातील कलम १३५ अन्वये अदखलपात्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे संशयितांविरोधात आवश्यकता भासल्यास प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलिसांना त्याचा फायदा होणार आहे.
जागेवरच कारवाई
टवाळखोरांवर वचक राहण्यासाठी शहर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे काही टोळक्यांना समज दिली जात असून, काहींना जागेवरच उठबशा काढण्यास सांगितले जाते. त्यामुळे परिसरातील नागरिकांसमोर पंचाईत होत असल्याच्या धास्तीने टोळके दिसेनासे होत असल्याचे चित्र काही ठिकाणी आहे.
हेही वाचा :
Pune Bangalore Highway Accident : पुणे-बंगळूर महामार्गावर भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक ठार
Maratha Reservation : संस्थानांकडे असलेले जुने रेकॉर्ड्स तपासा
Pune News : कचरा निर्मूलनासाठी पालिका अॅक्शन मोडवर
The post नाशिक : रस्त्यावर बर्थडे सेलिब्रेशन करणाऱ्यांना पोलिसांकडून चोप appeared first on पुढारी.
नाशिक : पुढारी वृत्तसेवा– वाढदिवस साजरा करण्यासाठी काही टोळके रस्त्यावरच धांगडधिंगा करीत असतात. ही बाब रोखण्यासाठी शहर पोलिसांनी आता सेलिब्रेशन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे. त्यानुसार चौकात गर्दी जमवून, केक कापून गोंधळ घालणाऱ्यांना काही वेळातच पोलिस ठाण्यात जमा व्हावे लागत आहे. वाढदिवसानिमित्त फटाके फोडणाऱ्यांविरोधात नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल करून दणका दिला आहे. शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात …
The post नाशिक : रस्त्यावर बर्थडे सेलिब्रेशन करणाऱ्यांना पोलिसांकडून चोप appeared first on पुढारी.