पुणे-बंगळूर महामार्गावर भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक ठार
किणी; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर महामार्ग ओलांडत असलेल्या दुचाकीला भरधाव कारने धडक दिली. या अपघातात गणेश अनिल निकम (वय २३, रा. सहारा चौक, पेठवडगांव) हा युवक ठार झाला. तर त्याचा लहान भाऊ वैभव अनिल निकम (वय २१) याचेसह कारमधील दोघे जखमी झाले. अंबप फाट्याजवळ आज (दि.७) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
पेठवडगावच्या सहारा चौकात राहणारे गणेश व अनिल निकम हे अंबप फाट्याजवळ एका कंपनीत काम करतात. नेहमीप्रमाणे सकाळी ते कामासाठी जात असताना अंबप फाट्याजवळ महामार्ग ओलांडत असताना कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला (एमएच १० बीडब्ल्यु ४६२०) जोराची धडक दिल्याने दोघेही भाऊ उडून पडले. यात गणेश याच्या डोक्याला जबरी मार लागला, तर वैभव यालाही बऱ्याच ठिकाणी मार लागण्याबरोबरच पाय फ्रॅक्चर झाला. या दोघांना गंभीर अवस्थेत १०८ रुग्णवाहिकेतुन प्राथमिक उपचार देत डॉ.वैभव कुंभार यांनी कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल केले. पण गणेशचा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच मृत्यू झाला. चारचाकी वाहनामधील रोनिता आरोजा व अनमोल डिकोस्टा हे दोघे जखमी झाले असून त्यांना वडगांव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा :
किरण लोहार यांच्याकडे ५ कोटींवर अवैध संपत्ती; पत्नी, मुलाविरुद्ध गुन्हा दाखल
कोल्हापूर : दुकानांवर मराठी फलक लावा; मनपाचे आवाहन
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ८ लाख बेरोजगार!
The post पुणे-बंगळूर महामार्गावर भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक ठार appeared first on पुढारी.
किणी; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर महामार्ग ओलांडत असलेल्या दुचाकीला भरधाव कारने धडक दिली. या अपघातात गणेश अनिल निकम (वय २३, रा. सहारा चौक, पेठवडगांव) हा युवक ठार झाला. तर त्याचा लहान भाऊ वैभव अनिल निकम (वय २१) याचेसह कारमधील दोघे जखमी झाले. अंबप फाट्याजवळ आज (दि.७) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. पेठवडगावच्या सहारा …
The post पुणे-बंगळूर महामार्गावर भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक ठार appeared first on पुढारी.