नाशिक पोलिस आयुक्त जाणणार पोलिसांच्या समस्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– शहराची कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांनाही बऱ्याच अडीअडचणींचा सामना करावा लागतो. त्यात वेतन, भत्ता, निवासाचा प्रश्न, वेळेचे नियोजन, आरोग्य आदी समस्या असतात. त्या जाणून घेत त्यावर तोडगा काढण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक हे गुरुवारी व शुक्रवारी (दि. ७ व ८) पोलिस आयुक्तालयात अंमलदारांची भेट घेणार आहेत. (Nashik Police) पोलिस आयुक्तपदाची धुरा … The post नाशिक पोलिस आयुक्त जाणणार पोलिसांच्या समस्या appeared first on पुढारी.
#image_title

नाशिक पोलिस आयुक्त जाणणार पोलिसांच्या समस्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– शहराची कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांनाही बऱ्याच अडीअडचणींचा सामना करावा लागतो. त्यात वेतन, भत्ता, निवासाचा प्रश्न, वेळेचे नियोजन, आरोग्य आदी समस्या असतात. त्या जाणून घेत त्यावर तोडगा काढण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक हे गुरुवारी व शुक्रवारी (दि. ७ व ८) पोलिस आयुक्तालयात अंमलदारांची भेट घेणार आहेत. (Nashik Police)
पोलिस आयुक्तपदाची धुरा सांभाळल्यानंतर कर्णिक यांनी गुन्हेगारांवर कारवाई करण्यास प्राधान्य दिले असून, त्यासोबतच नागरिकांकडून आलेल्या समस्या-तक्रारींचे निवारण करण्यावरही भर दिला आहे. त्यासाठी ते सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्कात आहेत. त्याचप्रमाणे पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठीही कर्णिक यांनी उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार, गुरुवारी व शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी 1 या वेळेत पाेलिस आयुक्त हे पोलिसांची भेट घेत त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, अडचणी जाणून घेणार आहेत. तसेच त्या सोडवण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. (Nashik Police)
पोलिसांना सेवा बजावत असताना अनेकदा आरोग्याच्या समस्या असतात. त्याचप्रमाणे रजा, विविध भत्ते मिळण्यात अडचणी, निवासाची अडचण, ड्युटीचा कालावधी या अडचणी सर्वाधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा :

NCRB Report : देशात दर तासाला पडतो तिघांचा मुडदा ! २०२२ मध्ये २८,५२२ हत्यांची नोंद
Nashik Drought News : भूजल पातळी घसरली, यंदा जानेवारीपासूनच दुष्काळाच्या झळा
मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह याचिकेवर ‘सुप्रीम’ सुनावणी पूर्ण

The post नाशिक पोलिस आयुक्त जाणणार पोलिसांच्या समस्या appeared first on पुढारी.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– शहराची कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांनाही बऱ्याच अडीअडचणींचा सामना करावा लागतो. त्यात वेतन, भत्ता, निवासाचा प्रश्न, वेळेचे नियोजन, आरोग्य आदी समस्या असतात. त्या जाणून घेत त्यावर तोडगा काढण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक हे गुरुवारी व शुक्रवारी (दि. ७ व ८) पोलिस आयुक्तालयात अंमलदारांची भेट घेणार आहेत. (Nashik Police) पोलिस आयुक्तपदाची धुरा …

The post नाशिक पोलिस आयुक्त जाणणार पोलिसांच्या समस्या appeared first on पुढारी.

Go to Source