समृद्धीवरील अपघातातील मयतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा; प्रभाग क्रमांक 30 मधील राजीवनगर वसाहत येथील रहिवासी यांचा (दि. १५ ऑक्टोबर रोजी समृध्दी महामार्गावर वैजापूर जि. संभाजीनगर जवळ अपघात झालेला होता. अपघातात राजीवनगर वसाहतीतील गांगुर्डे कुटुंबातील पती-पत्नी व मुलगा तसेच जगताप कुटुंबातील महिला मयत झालेले होते. नाशिक पश्चिमच्या आमदार सिमा हिरे यांच्या हस्ते मयातांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचे … The post समृद्धीवरील अपघातातील मयतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत appeared first on पुढारी.
#image_title

समृद्धीवरील अपघातातील मयतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा; प्रभाग क्रमांक 30 मधील राजीवनगर वसाहत येथील रहिवासी यांचा (दि. १५ ऑक्टोबर रोजी समृध्दी महामार्गावर वैजापूर जि. संभाजीनगर जवळ अपघात झालेला होता. अपघातात राजीवनगर वसाहतीतील गांगुर्डे कुटुंबातील पती-पत्नी व मुलगा तसेच जगताप कुटुंबातील महिला मयत झालेले होते. नाशिक पश्चिमच्या आमदार सिमा हिरे यांच्या हस्ते मयातांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले.
मृतांच्या नातेवाईकांना शासनातर्फे मदत जाहीर करण्यात आली होती. याचा पाठपुरावा आ. सीमा हिरे यांनी घेऊन शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत मयतांच्या कुटुंबीयांना दिली. प्रभाग क्र. ३० राजीवनगर वसाहत येथील रहिवासी मयत अंजाबाई रमेश जगताप यांचा मुलगा विशाल रमेश जगताप यांना रू ५,००,०००/चा धनादेश तसेच मयत झुंबर काशिनाथ गांगुर्डे, मयत सारिका झुंबर गांगुर्डे व मयत अमर झुंबर गांगुर्डे यांचे कुटुंबीय आकाश झुंबर गांगुर्डे व विकास झुंबर गांगुर्डे या दोन्ही भावंडाना रू.१५,०००००/(प्रत्येकी ७,५०,०००/)रुपयांचे धनादेश आ. सीमा हिरे यांच्या हस्ते आज वाटप करण्यात आले. स्वतः आमदार यांनी मयतांच्या घरी जावून त्यांच्या वारसांना आर्थिक मदत दिल्याने राजीवनगर येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी भाजपा नेते महेश हिरे, माजी नगरसेवक व भाजपा शहर सरचिटणीस ॲड.श्याम बडोदे, सुजित मोरे, अशोक पवार, मल्हारी जाधव, सनी वडमारे, राम बडोदे, महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिनेश आहिरे व श्री पवार हजर होते. यावेळी आमदार सीमा हिरे, भाजपा नेते महेश हिरे व माजी नगरसेवक ॲड. श्याम बडोदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. यावेळी परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :

Nashik Drought News : भूजल पातळी घसरली, यंदा जानेवारीपासूनच दुष्काळाच्या झळा
उपअधीक्षकांना तात्पुरती पदोन्नती
Pune News : कचरा निर्मूलनासाठी पालिका अ‍ॅक्शन मोडवर

The post समृद्धीवरील अपघातातील मयतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत appeared first on पुढारी.

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा; प्रभाग क्रमांक 30 मधील राजीवनगर वसाहत येथील रहिवासी यांचा (दि. १५ ऑक्टोबर रोजी समृध्दी महामार्गावर वैजापूर जि. संभाजीनगर जवळ अपघात झालेला होता. अपघातात राजीवनगर वसाहतीतील गांगुर्डे कुटुंबातील पती-पत्नी व मुलगा तसेच जगताप कुटुंबातील महिला मयत झालेले होते. नाशिक पश्चिमच्या आमदार सिमा हिरे यांच्या हस्ते मयातांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचे …

The post समृद्धीवरील अपघातातील मयतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत appeared first on पुढारी.

Go to Source