रतन टाटांना देखील ‘डीपफेक’चा फटका, लोकांना केले अलर्ट

पुढारी ऑनलाईन : देशातील प्रतिष्ठित उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनीही डीपफेकचा फटका बसला आहे. रतन टाटा यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत १०० टक्के परताव्याच्या हमीसह गुंतवणुकीबाबत त्यांचे नाव वापरून शेअर केलेला व्हिडिओ फेक असल्याचे म्हटले आहे. (Ratan Tata Deepfake Video) संबंधित बातम्या  Priyanka Chopra Deepfake : रश्मिका, आलिया, काजोलनंतर डीपफेकची … The post रतन टाटांना देखील ‘डीपफेक’चा फटका, लोकांना केले अलर्ट appeared first on पुढारी.
#image_title
रतन टाटांना देखील ‘डीपफेक’चा फटका, लोकांना केले अलर्ट


पुढारी ऑनलाईन : देशातील प्रतिष्ठित उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनीही डीपफेकचा फटका बसला आहे. रतन टाटा यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत १०० टक्के परताव्याच्या हमीसह गुंतवणुकीबाबत त्यांचे नाव वापरून शेअर केलेला व्हिडिओ फेक असल्याचे म्हटले आहे. (Ratan Tata Deepfake Video)
संबंधित बातम्या 

Priyanka Chopra Deepfake : रश्मिका, आलिया, काजोलनंतर डीपफेकची शिकार ठरली प्रियांका

Deepfake Video : आता आलिया भट्ट डीपफेक व्हिडिओची शिकार

Deepfake Video : ‘डीपफेक’ ही ‘गंमत’ नव्हे ‘गुन्हा’! बना टेक वॉरिअर्स!

लवंगी मिरची : फेक; पण डीपफेक!

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका स्टोरीमध्ये इन्स्टाग्राम यूजर सोना अग्रवालच्या पोस्टवर रतन टाटा यांनी जोरदार फटकारले आहे. रतन टाटा यांनी या व्हिडिओच्या स्क्रीनशॉटवर ‘फेक’ लिहून तो त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
या फेक व्हिडिओमध्ये रतन टाटांनी सोना अग्रवाल यांचा उल्लेख त्यांची व्यवस्थापक म्हणून करत असल्याचे दिसतात. एका इन्स्टा यूजरने एक फेक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये रतन टाटा सोना अग्रवाल यांना त्यांची व्यवस्थापक म्हणून संबोधत आहेत. १०० टक्के सुरक्षेची हमी देणाऱ्या गुंतवणुकीची शिफारस करणार्‍या या व्हिडिओमध्ये रतन टाटा यांच्या फेक मुलाखतीचा वापर करण्यात आला असून ही गुंतवणूक जोखीममुक्त असल्याचे सांगण्यात आले आहे.
या व्हिडिओमध्ये लोकांच्या खात्यात पैसे आल्याचे मेसेजीस दिसत आहेत. टाटा यांनी व्हिडिओवर आणि व्हिडिओ कॅप्शनच्या स्क्रीनशॉटवर FAKE लिहित तो शेअर केला आहे. याबाबत लोकांना त्यांनी अलर्ट केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून रतन टाटा यांच्या नावाचा वापर करून खोटे दावे केले जात आहेत. ऑक्टोबरमध्ये रतन टाटा यांच्या नावाने एक ट्विट व्हायरल झाले होते. आयसीसी वर्ल्ड कॅप लीग सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर रतन टाटा यांनी राशिद खान याला १० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा करण्यात आला होता. रतन टाटा यांना यावर खुलासा करावा लागला होता. (Ratan Tata Deepfake Video)
रतन टाटा यांनी ३० ऑक्टोबर रोजी एक ट्विट करत म्हटले होते की, ‘मी कोणत्याही खेळाडूशी संबंधित सल्ला अथवा तक्रारीबाबत आयसीसीला कोणताही सल्ला दिलेला नाही. माझा क्रिकेटशी काहीही संबंध नाही.’
The post रतन टाटांना देखील ‘डीपफेक’चा फटका, लोकांना केले अलर्ट appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन : देशातील प्रतिष्ठित उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनीही डीपफेकचा फटका बसला आहे. रतन टाटा यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत १०० टक्के परताव्याच्या हमीसह गुंतवणुकीबाबत त्यांचे नाव वापरून शेअर केलेला व्हिडिओ फेक असल्याचे म्हटले आहे. (Ratan Tata Deepfake Video) संबंधित बातम्या  Priyanka Chopra Deepfake : रश्मिका, आलिया, काजोलनंतर डीपफेकची …

The post रतन टाटांना देखील ‘डीपफेक’चा फटका, लोकांना केले अलर्ट appeared first on पुढारी.

Go to Source