रागीट बापाकडे अल्पवयीन मुलीचा ताबा नाही : हायकोर्ट
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : स्वभावाने रागीट तसेच हिंसक वर्तणूक असलेल्या बापाकडे अल्पवयीन मुलीचा ताबा देता येणार नाही. मुलीच्या सुरक्षेचा विचार करता अशा बापाकडे मुलीचा ताबा देऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने बुधवारी दिला.
लंडनचा नागरिक असलेल्या 41 वर्षीय व्यक्तीने विभक्त पत्नीकडून त्याच्या तीन वर्षांच्या मुलीचा ताबा मिळवण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती गाौरी गोडसे यांनी फेटाळून लावताना हा निर्वाळा दिला. पतीपासून विभक्त राहू लागलेल्या महिलेने लंडन येथून भारतातील आपल्या माहेर गाठले. तिने तीन वर्षांच्या मुलीचा ताबा स्वतःकडेच ठेवला होता. या पार्श्वभूमीवर पतीने मुलीला स्वतःच्या ताब्यात घेण्याच्या इच्छेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडस यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी विभक्त पत्नीने याचिकेलाच जोरदार आक्षेप घेतला.
The post रागीट बापाकडे अल्पवयीन मुलीचा ताबा नाही : हायकोर्ट appeared first on पुढारी.
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : स्वभावाने रागीट तसेच हिंसक वर्तणूक असलेल्या बापाकडे अल्पवयीन मुलीचा ताबा देता येणार नाही. मुलीच्या सुरक्षेचा विचार करता अशा बापाकडे मुलीचा ताबा देऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. लंडनचा नागरिक असलेल्या 41 वर्षीय व्यक्तीने विभक्त पत्नीकडून त्याच्या तीन वर्षांच्या मुलीचा ताबा मिळवण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका न्यायमूर्ती रेवती …
The post रागीट बापाकडे अल्पवयीन मुलीचा ताबा नाही : हायकोर्ट appeared first on पुढारी.