ठाणे : रेल्वे मार्गावरून फरफट नेऊन प्रवासी महिलेवर अत्याचार; एकास अटक

ठाणे : रेल्वे मार्गावरून फरफट नेऊन प्रवासी महिलेवर अत्याचार; एकास अटक

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : शॉर्टकट घर गाठणे एका प्रवासी महिलेला चांगलेच महागात पडले आहे. कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील टिटवाळा स्टेशनजवळ धक्कादायक प्रकार घडला आहे. लोकलमधून उतरून घराकडे निघालेल्या महिलेवर पाळतीवर असलेल्या एका बदमाशाने रेल्वे मार्गावरून फरफट नेऊन निर्जनस्थळी तिच्यावर अत्याचार केला. टिटवाळा रेल्वे स्थानकालगत हा प्रकार घडला. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी निशांत चव्हाण या बदमाशाला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र या घटनेनंतर टिटवाळ्यात खळबळ माजली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पीडित महिला एका खासगी कंपनीत नोकरी करते. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास ती शहाडहून निघालेल्या लोकलने टिटवाळा स्टेशनवर उतरली. त्यानंतर ही महिला शॉर्टकट मार्ग असलेल्या रेल्वे मार्गावरून आपल्या घराकडे जात होती. याच दरम्यान पाळतीवर असलेला एक जण तिचा पाठलाग करत होता. ही महिला मोबाईलवर आपल्या पतीशी बोलत असल्यामुळे गाफील होती. पाठलाग करणाऱ्याने जबरदस्तीने रूळालगत असलेल्या झुडुपात ओढून नेले आणि तेथे तिच्यावर अत्याचार केला.
विशेष म्हणजे याच दरम्यान पीडित महिलेचा फोन सुरूच होता. या घटनेची कुठे वाच्यता केलीस तर जीवाला मुकशील, अशी या नराधमाने त्या महिलेला धमकी दिली. त्यानंतर या नराधमाच्या तावडीतून महिलेने कशीबशी सुटका करवून घेतली.त्यानंतर भयभीत महिलेने तिच्यावर बेतलेला सारा प्रकार घरी जाऊन आपल्या पतीला सांगितला.
पतीने तात्काळ ही माहिती त्याच परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना मोबाईलद्वारे कळवून मदत मागीतली. आजूबाजूच्या रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेत घेऊन त्या नराधमाला पकडले आणि चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. निशांत चव्हाण याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. यातील पिडीत महिलेच्या जबानीवरून कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
आरोपी निशांत हा भिवंडी तालुक्यातील पडघा येथे एका खासगी कंपनीत नोकरी करतो. त्याने यापूर्वी असे प्रकार केले आहे का ? त्याच्यावर कुठल्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत का ? याची चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसचे सहाय्यक पोलिस आयुक्त मनोज पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा : 

Nashik crime news : घोटी येथे डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल
सिंधुदुर्ग: ट्रकच्या धडकेत तळेरे येथील तरुण ठार; वडील जखमी
अलुवा बालिका अत्‍याचार आणि हत्या प्रकरणातील नराधमास फाशीची शिक्षा

The post ठाणे : रेल्वे मार्गावरून फरफट नेऊन प्रवासी महिलेवर अत्याचार; एकास अटक appeared first on पुढारी.

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : शॉर्टकट घर गाठणे एका प्रवासी महिलेला चांगलेच महागात पडले आहे. कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील टिटवाळा स्टेशनजवळ धक्कादायक प्रकार घडला आहे. लोकलमधून उतरून घराकडे निघालेल्या महिलेवर पाळतीवर असलेल्या एका बदमाशाने रेल्वे मार्गावरून फरफट नेऊन निर्जनस्थळी तिच्यावर अत्याचार केला. टिटवाळा रेल्वे स्थानकालगत हा प्रकार घडला. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी निशांत …

The post ठाणे : रेल्वे मार्गावरून फरफट नेऊन प्रवासी महिलेवर अत्याचार; एकास अटक appeared first on पुढारी.

Go to Source