जळगाव : भुसावळ नगरपालिकेवर भाजपचा मोर्चा

जळगाव: पुढारी वृत्तसेवा: भुसावळ शहरातील व्यापारी संकुलातील ३० ते ५० वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना भुसावळ नगरपालिकेने दुकाने खाली करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. याविरोधात भाजपच्या वतीने नगरपालिकेसमोर आज (दि.६) आंदोलन करण्यात आले. यावेळी नोटीस रद्द करण्याची मागणी करण्यात आली. भुसावळ शहरात मागील ३० ते ५० वर्षांपासून नगरपालिकेने व्यापाऱ्यांना दुकान गाळे भाडेतत्वावर दिले आहेत. परंतु मागील काही … The post जळगाव : भुसावळ नगरपालिकेवर भाजपचा मोर्चा appeared first on पुढारी.
#image_title

जळगाव : भुसावळ नगरपालिकेवर भाजपचा मोर्चा

जळगाव: पुढारी वृत्तसेवा: भुसावळ शहरातील व्यापारी संकुलातील ३० ते ५० वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना भुसावळ नगरपालिकेने दुकाने खाली करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. याविरोधात भाजपच्या वतीने नगरपालिकेसमोर आज (दि.६) आंदोलन करण्यात आले. यावेळी नोटीस रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
भुसावळ शहरात मागील ३० ते ५० वर्षांपासून नगरपालिकेने व्यापाऱ्यांना दुकान गाळे भाडेतत्वावर दिले आहेत. परंतु मागील काही वर्षांपासून दुकानांचे भाडे व्यापाऱ्यांकडून थकित आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वी वसुलीसह दंडाची आणि दुकाने खाली करण्याच्या नोटीसा पालिकेने बजावल्या होत्या. परंतु, दिवाळी असल्याने तूर्तास स्थगिती दिली होती. त्यानंतर आता भुसावळ नगरपालिकेने पुन्हा दुकाने खाली करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत.
या नोटीसीला भाजपने तीव्र विरोध केला आहे. अचानकपणे दुकाने खाली करण्याचे आदेश पालिकेने दिल्याने व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. व्यापाऱ्यांना बजावलेली नोटीस तात्काळ रद्द करावी, अशी मागणी भाजपने निवेदनाद्वारे केली आहे. याडी भाजपाचे शहराध्यक्ष परीक्षेत बऱ्हाटे, युवराज लोणारी अॅड. बोधराज चौधरी, महेंद्रसिंग ठाकूर, मनोज बियाणे, प्रमोद नेमाडे, संदीप सुरवाडे, सतिश सपकाळे आदी उपस्थित होते.
हेही वाचा 

जळगाव जिल्ह्यातून सहा मोटरसायकल, एक डंपर चोरीला
जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास १० वर्षांची सक्तमजुरी
जळगाव : पोलिसही जरांगे पाटलांचे चाहते, फोटो अन् सेल्फी’चा आवरेना मोह

The post जळगाव : भुसावळ नगरपालिकेवर भाजपचा मोर्चा appeared first on पुढारी.

जळगाव: पुढारी वृत्तसेवा: भुसावळ शहरातील व्यापारी संकुलातील ३० ते ५० वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना भुसावळ नगरपालिकेने दुकाने खाली करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. याविरोधात भाजपच्या वतीने नगरपालिकेसमोर आज (दि.६) आंदोलन करण्यात आले. यावेळी नोटीस रद्द करण्याची मागणी करण्यात आली. भुसावळ शहरात मागील ३० ते ५० वर्षांपासून नगरपालिकेने व्यापाऱ्यांना दुकान गाळे भाडेतत्वावर दिले आहेत. परंतु मागील काही …

The post जळगाव : भुसावळ नगरपालिकेवर भाजपचा मोर्चा appeared first on पुढारी.

Go to Source