Nagar : चेन स्नॅचिंग करणारा जेरबंद ; राज्यात गंभीर गुन्हे दाखल
नगर : पुढारी वृत्तसेवा : नगरमधील बालिकाश्रम रोड परिसरात रस्त्याने पायी जाणार्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणार्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कल्याण येथून जेरबंद केले. त्याच्याकडून 9 हजार 700 रुपये हस्तगत केले असून, त्याला तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुसा अण्णु सय्यद उर्फ इराणी (वय 30, रा. अंबिवली, कल्याण, ता. कल्याण, जि. ठाणे) असे आरोपीचे नाव आहे. 1 डिसेंबर रोजी सकाळी शारदा रघुनाथ गाजुल या बालिकाश्रम रोडने जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील एक लाख पाच हजार रुपये किमतीचे अडीच साडेतीन तोळ्याचे सोने हिसकावून पळाले होते.
पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात संशयित मुसा अण्णू सय्यद उर्फ इराणी (रा. अंबिवली, कल्याण) असून, तो कल्याण येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी कल्याण येथे जावून सापळा लावला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला अटक केली. त्यावेळी आरोपीच्या महिला नातेवाईकांनी आरोपीला पोलिसाच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दुचाकीवर येऊन अहमदनगर व श्रीरामपूर येथे गंठण चोरी केल्याचे सांगितले.
The post Nagar : चेन स्नॅचिंग करणारा जेरबंद ; राज्यात गंभीर गुन्हे दाखल appeared first on पुढारी.
नगर : पुढारी वृत्तसेवा : नगरमधील बालिकाश्रम रोड परिसरात रस्त्याने पायी जाणार्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणार्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कल्याण येथून जेरबंद केले. त्याच्याकडून 9 हजार 700 रुपये हस्तगत केले असून, त्याला तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुसा अण्णु सय्यद उर्फ इराणी (वय 30, रा. अंबिवली, कल्याण, ता. कल्याण, जि. ठाणे) असे …
The post Nagar : चेन स्नॅचिंग करणारा जेरबंद ; राज्यात गंभीर गुन्हे दाखल appeared first on पुढारी.