सुभेदार चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
पुढारी ऑनलाईन डेस्क : राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेल्या स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीमध्ये अनेक शूरवीरांनी मोलाची साथ दिली. महाराष्ट्राच्या शिवकालीन इतिहासातील प्रत्येक पान या शूरवीरांच्या अतुलनीय शौर्याने भरलेलं आहे. सुभेदार तानाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम ही अशीच एक अद्वितीय सुवर्णगाथा. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ‘सुभेदार’ ( Subhedar Movie ) या चित्रपटातून तानाजी मालुसरे यांची कथा घेवून आले आहेत. यामुळे दैदिप्यमान इतिहास पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
संबंधित बातम्या
Suruchi Adarkar : का रे दुरावा फेम सुरुची आडारकर अडकली विवाह बंधनात; कोण आहे तिचा पती?
अबोल प्रीतीची गजब कहाणी : अखेर मयूरीच सत्य राजवीर समोर येणार
सारं काही तिच्यासाठी : “मुंबईत मिळणार का निशीच्या स्वप्नाला नवीन पंख?”
१७ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर सुभेदार चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. ‘आधी लगीन कोंढाण्याचं मग आमच्या रायबाचं’ असं म्हणत तानाजी मालुसरे यांनी कोंढाण्याची मोहीम हाती घेतली. शत्रूंच्या १५०० सैन्यासमोर अवघे ५०० मावळे हाताशी घेऊन तानाजी शेवटच्या श्वासापर्यंत लढले. शूरवीर तानाजींचा हा झंझावात सुभेदार चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे.
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटात चिन्यम मांडलेकर, अजय पूरकर, मृणाल कुलकर्णी, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे, मृण्मयी देशपांडे, स्मिता शेवाळे, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना, अभिजीत श्वेतचंद्र असे दिग्गज कलाकार आहेत. मराठ्यांचा दैदिप्यमान पराक्रमाचा अनुभव पाहण्यासाठी चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
The post सुभेदार चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेल्या स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीमध्ये अनेक शूरवीरांनी मोलाची साथ दिली. महाराष्ट्राच्या शिवकालीन इतिहासातील प्रत्येक पान या शूरवीरांच्या अतुलनीय शौर्याने भरलेलं आहे. सुभेदार तानाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम ही अशीच एक अद्वितीय सुवर्णगाथा. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ‘सुभेदार’ ( Subhedar Movie ) या चित्रपटातून तानाजी मालुसरे यांची कथा घेवून आले …
The post सुभेदार चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर appeared first on पुढारी.