आता मराठा समाज महाराष्ट्रात शिल्लकच राहणार नाही: छगन भुजबळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले असताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा विधान केले आहे. आता मराठा समाजाचे सगळेच लोक कुणबी प्रमाणपत्र घेऊ लागले आहेत. आणि ते ओबीसींमध्ये येत आहेत. त्यामुळे मराठा समाज महाराष्ट्रात शिल्लकच राहणार नाही, असा दावा  भुजबळ यांनी केला आहे. Chhagan Bhujbal … The post आता मराठा समाज महाराष्ट्रात शिल्लकच राहणार नाही: छगन भुजबळ appeared first on पुढारी.
#image_title

आता मराठा समाज महाराष्ट्रात शिल्लकच राहणार नाही: छगन भुजबळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले असताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा विधान केले आहे. आता मराठा समाजाचे सगळेच लोक कुणबी प्रमाणपत्र घेऊ लागले आहेत. आणि ते ओबीसींमध्ये येत आहेत. त्यामुळे मराठा समाज महाराष्ट्रात शिल्लकच राहणार नाही, असा दावा  भुजबळ यांनी केला आहे. Chhagan Bhujbal
छगन भुजबळ म्हणाले की, सगळेच जर मराठा कुणबी होणार आहेत, तर मग क्युरेटिव्ह पिटिशन करा किंवा बिल आणा, पण बाहेर कोण राहणार आहे? आयोगाचे लोकही आता राजीनामा देत आहेत. आता हा ओबीसींचा आयोग राहिलाच नाही, हा मराठ्यांचा आयोग झाला आहे. सगळेच कुणबी होणार आहेत. त्यामुळे कुठल्याही उपायांची गरज आहे, असे मला वाटत नाही. Chhagan Bhujbal
सध्या दादागिरी करून कुणबी प्रमाणपत्रे घेतली जात आहेत. खोटी प्रमाणपत्रे दिली जात आहेत. यापुढेही जातपडताळणीच्या वेळी दादागिरी करणार आणि अशीच प्रमाणपत्रे घेतली जाणार आहेत, असा आरोपही भुजबळ यांनी यावेळी केला.
मनोज जरांगे- पाटील माझ्याविरोधात रोज बोलत आहे. कारण त्याशिवाय त्याचे भाषण कुणीच ऐकणार नाही. हरिभाऊ राठोड गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी समाजात फूट पाडण्याचे काम करत असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला आहे.
हेही वाचा 

Manoj Jarange Patil : छगन भुजबळ हे पनवती; मनोज जरांगेंचा घणाघात
छगन भुजबळांची सरकारमधून हकालपट्टी करा
Pune News : राज्यात नवीन वर्णव्यवस्था यायला लागली : मंत्री छगन भुजबळ

The post आता मराठा समाज महाराष्ट्रात शिल्लकच राहणार नाही: छगन भुजबळ appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले असताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा विधान केले आहे. आता मराठा समाजाचे सगळेच लोक कुणबी प्रमाणपत्र घेऊ लागले आहेत. आणि ते ओबीसींमध्ये येत आहेत. त्यामुळे मराठा समाज महाराष्ट्रात शिल्लकच राहणार नाही, असा दावा  भुजबळ यांनी केला आहे. Chhagan Bhujbal …

The post आता मराठा समाज महाराष्ट्रात शिल्लकच राहणार नाही: छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Go to Source