ग्रामस्थांच्या चेहर्‍यावर आनंद ! जलजीवनच्या 40 योजनांची यशस्वी चाचणी

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जलजीवन योजनेतून गावात आणि थेट घरामध्ये पाणी आल्याने ग्रामस्थांच्या चेहर्‍यावर झळकलेला आनंद पाहून पाणी पुरवठा मंत्री यांचे प्रशासकीय सल्लागार तथा मुख्य अभियंता एस. पलांडे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी व्हिसीव्दारे त्यांनी थेट जनतेशी संवाद साधून नगरच्या प्रशासनाचे कौतुक केल्याचे दिसले. जलजीवन मिशन योजनेतून 40 पाणी योजनांची काल मंगळवारी व्हिसीव्दारे ऑनलाईन … The post ग्रामस्थांच्या चेहर्‍यावर आनंद ! जलजीवनच्या 40 योजनांची यशस्वी चाचणी appeared first on पुढारी.
#image_title

ग्रामस्थांच्या चेहर्‍यावर आनंद ! जलजीवनच्या 40 योजनांची यशस्वी चाचणी

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जलजीवन योजनेतून गावात आणि थेट घरामध्ये पाणी आल्याने ग्रामस्थांच्या चेहर्‍यावर झळकलेला आनंद पाहून पाणी पुरवठा मंत्री यांचे प्रशासकीय सल्लागार तथा मुख्य अभियंता एस. पलांडे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी व्हिसीव्दारे त्यांनी थेट जनतेशी संवाद साधून नगरच्या प्रशासनाचे कौतुक केल्याचे दिसले. जलजीवन मिशन योजनेतून 40 पाणी योजनांची काल मंगळवारी व्हिसीव्दारे ऑनलाईन पद्धतीने यशस्वी चाचणी झाली. या चाचणीप्रसंगी पलांडे ह्याही ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होत्या.
तसेच जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात कार्यकारी अभियंता श्रीरंग गडदे यांनी जलजीवन योजनेला गती दिली आहे. यापूर्वीही अडीचशे पेक्षा अधिक योजनांची यशस्वी चाचणी झाली आहे. येणार्‍या उन्हाळ्यात या योजनांची उपयुक्तता जनतेला कळणार आहे. काल मंगळवारी देखील जलजीवनच्या 40 योजनांची यशस्वी चाचणी घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी देखील विविध गावांतील लाभार्थी यांच्याशी संवाद साधला.
दरम्यान, आजच्या या व्हिसीमध्ये तालुक्यातील सर्व उपअभियंता, शाखा अभियंता, तसेच लाभार्थी सरपंच, सदस्य ऑनलाईन सहभागी झाले होते. मुख्य अभियंता पलांडे यांनी ऑनलाईन ्उपस्थित दर्शवत थेट लाभार्थी जनतेशी संवाद साधत गावात पहिल्यांदा पाणी योजना आली, आपल्या घरासमोर अगदी घरातही पाणी पोहच झाले, त्यामुळे आता काय भावना आहेत, याबाबत आवर्जून जाणून घेतले. यावेळी ग्रामस्थांच्या चेहर्‍यावर आनंद पाहून त्यांनी सीईओंच्या कामाचे आणि थेट जनतेशी संपर्क साधण्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी धोत्रे, कासली,चांदेकसारे, सोनेवाडी, भोयरे पठार,भोयरे खुर्द,निमगाव कोर्‍हाळे, नांदुर्खी बुद्रुक, वांगी बुद्रुक, मालुंजे बुद्रुक, कोल्हेवाडी, बहिरोबावाडी,मलठण, भोसे,येसवाडी, चनेगाव, शिबलापूर, दाढ खुर्द,आश्वी, जातेगाव, बर्‍हाणपूर, धामणगाव, बेलापूर, अळकुटी, तांदूळनेर, गुहा, वडनेर इत्यादी 40 योजनांची यशस्वी चाचणी घेेण्यात आली.
हेही वाचा :

Pune : आंबेगावात कांदा रोपांचा तुटवडा
Winter Session Nagpur 2023 : अधिवेशनामध्ये नागपूर विधानभवनातील राष्ट्रवादीचे कार्यालय अजित पवार गटाकडे

The post ग्रामस्थांच्या चेहर्‍यावर आनंद ! जलजीवनच्या 40 योजनांची यशस्वी चाचणी appeared first on पुढारी.

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जलजीवन योजनेतून गावात आणि थेट घरामध्ये पाणी आल्याने ग्रामस्थांच्या चेहर्‍यावर झळकलेला आनंद पाहून पाणी पुरवठा मंत्री यांचे प्रशासकीय सल्लागार तथा मुख्य अभियंता एस. पलांडे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी व्हिसीव्दारे त्यांनी थेट जनतेशी संवाद साधून नगरच्या प्रशासनाचे कौतुक केल्याचे दिसले. जलजीवन मिशन योजनेतून 40 पाणी योजनांची काल मंगळवारी व्हिसीव्दारे ऑनलाईन …

The post ग्रामस्थांच्या चेहर्‍यावर आनंद ! जलजीवनच्या 40 योजनांची यशस्वी चाचणी appeared first on पुढारी.

Go to Source