नागपूर, पुढारी वृत्तसेवा: राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला गुरूवारपासून (दि.७) नागपुरात सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर तीन राज्यातील निकालानंतर भाजप, महायुतीत उत्साह असताना अधिवेशनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. ‘फक्त १० दिवस होणाऱ्या अधिवेशनात स्वागत..’, या स्वरुपाचे बॅनर्स शरद पवार गटाकडून लावण्यात आले आहेत. (NCP Sharad Pawar)
उपराजधानी नागपुरातील राजकीय वातावरण एकीकडे पावसाळी वातावरण असताना तापायला सुरुवात झाली आहे. हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवड्याचे व्हावे, अशी विरोधकांची मागणी असताना ते केवळ दहा दिवसच चालणार असल्याचे नमूद करीत शरद पवार गटाने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शहरात बॅनरबाजी सुरु केली आहे. (NCP Sharad Pawar)
राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता शरद पवार अधिक आक्रमक होण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याची झलक आता शरद पवार गटाच्या बॅनरबाजीतून बघायला मिळत आहे. नागपूर विमानतळाजवळ तसेच सिव्हील लाईन्स परिसरात शरद पवार गटाकडून असे लक्षवेधी बॅनर झळकत आहेत. याची सगळीकडे चर्चा सुरू आहे.
हेही वाचा
‘…तो निर्णय शरद पवारांचा असता तर आम्हीही तिकडेच असतो’ : आमदार रोहित पवार
Pimpri News : शरद पवार गटाची ओबीसी पाठोपाठ युवक आघाडी !
NCP Crisis : राष्ट्रवादीत फूटच नसल्याने सुनावणीचा अधिकार कसा?, शरद पवार गटाचा निवडणूक आयोगासमोर सवाल
The post ‘फक्त १० दिवस होणाऱ्या अधिवेशनात स्वागत..’; नागपुरात शरद पवार गटाची लक्षवेधी बॅनरबाजी appeared first on पुढारी.
नागपूर, पुढारी वृत्तसेवा: राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला गुरूवारपासून (दि.७) नागपुरात सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर तीन राज्यातील निकालानंतर भाजप, महायुतीत उत्साह असताना अधिवेशनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. ‘फक्त १० दिवस होणाऱ्या अधिवेशनात स्वागत..’, या स्वरुपाचे बॅनर्स शरद पवार गटाकडून लावण्यात आले आहेत. (NCP Sharad Pawar) उपराजधानी नागपुरातील राजकीय …
The post ‘फक्त १० दिवस होणाऱ्या अधिवेशनात स्वागत..’; नागपुरात शरद पवार गटाची लक्षवेधी बॅनरबाजी appeared first on पुढारी.