तिसरा दिवस, नवा विक्रमी उच्चांक! निफ्टी २१ हजारांजवळ, अदानी शेअर्समध्ये तुफान तेजी

पुढारी ऑनलाईन : यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीचे संकेत आणि परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारात वाढता ओघ आज बुधवारी (दि. ६) पुन्हा सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीला नव्या विक्रमी उच्चांकावर घेऊन गेला. सेन्सेक्स आज ३५७ अंकांनी वाढून ६९,६५३ वर बंद झाला. तर निफ्टी ८२ अंकांच्या वाढीसह २०,९३७ वर बंद झाला. क्षेत्रीय पातळीवर आज बहुतांश क्षेत्रीय … The post तिसरा दिवस, नवा विक्रमी उच्चांक! निफ्टी २१ हजारांजवळ, अदानी शेअर्समध्ये तुफान तेजी appeared first on पुढारी.
#image_title

तिसरा दिवस, नवा विक्रमी उच्चांक! निफ्टी २१ हजारांजवळ, अदानी शेअर्समध्ये तुफान तेजी

पुढारी ऑनलाईन : यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीचे संकेत आणि परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारात वाढता ओघ आज बुधवारी (दि. ६) पुन्हा सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीला नव्या विक्रमी उच्चांकावर घेऊन गेला. सेन्सेक्स आज ३५७ अंकांनी वाढून ६९,६५३ वर बंद झाला. तर निफ्टी ८२ अंकांच्या वाढीसह २०,९३७ वर बंद झाला.
क्षेत्रीय पातळीवर आज बहुतांश क्षेत्रीय निर्देशांकांनी हिरव्या चिन्हात व्यवहार केला. कॅपिटल गुड्स, एफएमसीजी, आयटी, ऑईल आणि गॅस तसेच पॉवर १-२ टक्क्यांनी वाढले. तर बँक, हेल्थ केअर प्रत्येकी ०.५ टक्के आणि रियल्टी निर्देशांक ०.३ टक्क्यांनी घसरला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक किरकोळ वाढले.
विप्रोचा शेअर टॉप गेनर
सेन्सेक्स आज ६९,५३४ अंकांवर खुला झाला होता. त्यानंतर तो ६९,७४४ पर्यंत वाढला. सेन्सेक्सवर विप्रोचा शेअर टॉप गेनर होता. हा शेअर ३.९५ क्क्यांनी वाढून ४२०रुपयांवर पोहोचला. त्याचसोबत आयटीसी, एलटी, टीसीएस, टाटा मोटर्स, नेस्ले मोटर्स, इन्फोसिस, पॉवर ग्रिड, एम अँड एम, एचसीएल टेक, बजाज फायनान्स, रिलायन्स हे शेअर्सही वाढले. तर एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, भारती एअरटेल हे शेअर्स घसरले.
अदानी शेअर्समध्ये सलग तिसऱ्या सत्रात तेजी कायम
अदानी शेअर्समधील तेजी बुधवारीही कायम राहिली आहे. अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा शेअर सुमारे ५ टक्के वाढून ३,११२ रुपयांवर पोहोचला, तर अदानी ग्रीन एनर्जी १९ टक्क्यांनी वाढला. विशेष म्हणजे बुधवारच्या व्यवहारात अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या शेअर्समध्ये सलग तिसऱ्या सत्रात तेजी कायम राहिली आहे. हा शेअर आज १९ टक्क्यांनी वाढून १,६०५ रुपयांच्या दिवसाच्या उच्चांकावर पोहोचला. अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी टोटल गॅस आणि एनडीटीव्ही हे शेअर्स १० ते १६ टक्क्यांदरम्यान वाढले. अदानी पोर्ट्स आणि अदानी पॉवर अनुक्रमे ५ टक्के आणि ८ टक्क्यांनी वाढले.
कोणते घटक तेजीसाठी ठरले आहेत महत्त्वाचे?
नुकत्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले यश, यूएस फेडरलकडून व्याजदरकपातीचे संकेत, कच्च्या तेलाच्या किमतीत सुधारणा, मजबूत देशांतर्गत मॅक्रो इकॉनॉमिक डेटा, परदेशी गुंतवणूकदारांचा वाढलेला ओघ या पार्श्वभूमीवर बाजारात तेजीचा माहौल पसरला आहे.
परदेशी गुंतवणूकदारांचा ओघ वाढला
एनएसईवरील उपलब्ध आकडेवारीनुसार, ५ डिसेंबर रोजी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) ५,२२३.५१ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DII) १,३९९.१८ कोटी रुपयांचे शेअर्स विकले.
 
The post तिसरा दिवस, नवा विक्रमी उच्चांक! निफ्टी २१ हजारांजवळ, अदानी शेअर्समध्ये तुफान तेजी appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन : यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीचे संकेत आणि परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारात वाढता ओघ आज बुधवारी (दि. ६) पुन्हा सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीला नव्या विक्रमी उच्चांकावर घेऊन गेला. सेन्सेक्स आज ३५७ अंकांनी वाढून ६९,६५३ वर बंद झाला. तर निफ्टी ८२ अंकांच्या वाढीसह २०,९३७ वर बंद झाला. क्षेत्रीय पातळीवर आज बहुतांश क्षेत्रीय …

The post तिसरा दिवस, नवा विक्रमी उच्चांक! निफ्टी २१ हजारांजवळ, अदानी शेअर्समध्ये तुफान तेजी appeared first on पुढारी.

Go to Source