नाशिक : महाकाल दरबारने दुमदुमला गोदाघाट

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा– भोले की भक्ती का एक ही कायदा, इस मै मिले तो सब को फायदा ही फायदा’ या गाण्याने गोदाघाट परिसर भोलेमय झाला होता. उज्जैन येथील गायक किशन भगत यांच्या भव्य भजन संध्या व महाकाल दरबार या गायन कार्यक्रमाचे आयोजन जुना भाजी बाजार पटांगणात श्री कपालेश्वर शिवतांडव वाद्य मित्र परिवारातर्फे करण्यात आले … The post नाशिक : महाकाल दरबारने दुमदुमला गोदाघाट appeared first on पुढारी.
#image_title

नाशिक : महाकाल दरबारने दुमदुमला गोदाघाट

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा– भोले की भक्ती का एक ही कायदा, इस मै मिले तो सब को फायदा ही फायदा’ या गाण्याने गोदाघाट परिसर भोलेमय झाला होता. उज्जैन येथील गायक किशन भगत यांच्या भव्य भजन संध्या व महाकाल दरबार या गायन कार्यक्रमाचे आयोजन जुना भाजी बाजार पटांगणात श्री कपालेश्वर शिवतांडव वाद्य मित्र परिवारातर्फे करण्यात आले होते.
गायक किशन भगत हे उज्जैन येथील असून स्वतः शिवभक्त आहेत. त्यांनी लिहिलेली व सुप्रसिध्द असणारी अनेक गाणी त्यांनी गायली. यात महाकाल के नगरी मैं घर होना चाहिए, ओ मेरे बाबा भोलेनाथ, महाकाल तेरे भक्ती ने बवाल कर दिया, ओ महाकाल मेरे महाकाल, भोले की सवारी आई शिवजी की सवारी आयी उज्जैन नगर तसेच उपस्थित शिवभक्तांना समवेत तुम्हे ही पुजे रात और दिन गणेश भगवान अशी अनेक शिव भक्तीपर गाणी म्हटली. तर उपस्थितांनी यावेळी बम बम भोले, बम भोलेनाथ, जय महाकाल, श्री महाकाल अशा घोषणा ही दिल्या. या शिवमय वातावरणात भाविक तल्लीन झाले होते.
या वेळी भोले भक्तांनी गोदा घाटावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कार्यक्रमास आमदार राहुल ढिकले, माजी नगरसेवक कमलेश बोडके, उल्हास धनवटे, नरेश पाटील यांसह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक मनोज माळी होते. तर विशाल गोवर्धने, अमित खांदवे, प्रथमेश बनछोडे, सिद्धेश गुप्ता, विवेक मौर्य, नीरज परदेशी हे निमंत्रक होते.

हेही वाचा :

BJP MPs | नरेंद्र तोमर, प्रल्हाद पटेल, राठोड यांच्यासह भाजपच्या १० खासदारांचे राजीनामे
नागपूर : राष्ट्रवादीच्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप १२ डिसेंबरला : अनिल देशमुख
Apurva Nemalekar : अपूर्वा नेमळेकर स्विमिंग पुलामध्ये हॉट, नेटकरी म्हणाले…

The post नाशिक : महाकाल दरबारने दुमदुमला गोदाघाट appeared first on पुढारी.

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा– भोले की भक्ती का एक ही कायदा, इस मै मिले तो सब को फायदा ही फायदा’ या गाण्याने गोदाघाट परिसर भोलेमय झाला होता. उज्जैन येथील गायक किशन भगत यांच्या भव्य भजन संध्या व महाकाल दरबार या गायन कार्यक्रमाचे आयोजन जुना भाजी बाजार पटांगणात श्री कपालेश्वर शिवतांडव वाद्य मित्र परिवारातर्फे करण्यात आले …

The post नाशिक : महाकाल दरबारने दुमदुमला गोदाघाट appeared first on पुढारी.

Go to Source