दौंडला सुप्रिया सुळे यांची लोकसभेची मोर्चेबांधणी
खोर : पुढारी वृत्तसेवा : आगामी बारामती लोकसभा निवडणूक ही दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला लावणारी ठरणार असून, अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटामधील महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांचे नाव निश्चित झाले आहे. महायुती असलेल्या भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट यांच्यात अजूनही बारामतीची जागा निश्चित करण्यात आलेली नसल्याने संभ्रमावस्था आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दौंड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष आप्पासाहेब पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून निष्ठावंत शिलेदार खा. सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभे आहेत. सुळे यांच्यासाठी ते दौंडच्या रिंगणात ताकदीने उतरले आहेत. खा. सुळेदेखील दौंड तालुक्यात सध्या जातीने लक्ष देत आहेत. मागच्या वेळेस कमी पडलेले मताधिक्य कसे वाढविले जाईल याकडे लक्ष देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटांत विभागाला गेला असल्याने अनेक दिग्गज नेते हे उपमुख्यमंत्री अजित पवार गटात गेले आहेत. दौंड तालुक्याची खा. सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी सध्या आप्पासाहेब पवार यांच्यावर येऊन पडली आहे.
हेही वाचा :
Kiran Lohar : डिसले गुरुजींवर कारवाईचा प्रस्ताव देणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्याकडे सापडले घबाड; किरण लोहार यांच्याकडे ५ कोटींवर अवैध संपत्ती
Pune : जवळेत आढळली रानमांजराची पिले
The post दौंडला सुप्रिया सुळे यांची लोकसभेची मोर्चेबांधणी appeared first on पुढारी.
खोर : पुढारी वृत्तसेवा : आगामी बारामती लोकसभा निवडणूक ही दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला लावणारी ठरणार असून, अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटामधील महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांचे नाव निश्चित झाले आहे. महायुती असलेल्या भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट यांच्यात अजूनही बारामतीची जागा निश्चित करण्यात आलेली नसल्याने संभ्रमावस्था आहे. …
The post दौंडला सुप्रिया सुळे यांची लोकसभेची मोर्चेबांधणी appeared first on पुढारी.