जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर जहरी टीका, ढेरी सुटलेला फोटो केला शेअर
पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जहरी टीका केली आहे. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आव्हाडांच्या सुटलेल्या ढेरीचा उल्लेख केला होता. अजित पवारांच्या या पत्रकार परिषदेला जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटरवरुन जोरदार प्रत्युत्तर दिला आहे. (Jitendra awhad on Ajit Pawar)
जितेंद्र आव्हाड अजित पवारांचा ढेरी सुटलेला फोटो शेअर करत म्हणाले, “दादा त्या दिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला तेव्हा मला वाटले की तुम्ही व्यायाम करुन 6 pack abs केले असतील पण हा पर्वाचा फोटो तुमची ढेरी दाखवतो.. haha” (Jitendra awhad on Ajit Pawar)
अजित पवार यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली नसती तर मी त्यांच्या विरोधात एक शब्दही काढला नसता, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले. आव्हाड यांनी याबाबत आणखी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये ते लिहितात, “दादा तुम्ही माझ्यावर वयक्तिक बोलला नसतात तर …मी तर आपल्या विरोधात एक शब्द काढला नव्हता मग माझ्या वर दर वेळेस वयक्तिक टीका कश्या साठी?”, असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. (Jitendra awhad on Ajit Pawar)
दादा तुम्ही माझ्यावर वयक्तिक बोलला नसतात तर …मी तर आपल्या विरोधात एक शब्द काढला नव्हता
मग माझ्या वर दर वेळेस वयक्तिक टीका कश्या साठी? https://t.co/r2WKuyHFbz
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 6, 2023
हेही वाचलंत का?
Winter Session Nagpur 2023 : अधिवेशनामध्ये नागपूर विधानभवनातील राष्ट्रवादीचे कार्यालय अजित पवार गटाकडे
Priyanka Chopra Deepfake : रश्मिका, आलिया, काजोलनंतर डीपफेकची शिकार ठरली प्रियांका
The post जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर जहरी टीका, ढेरी सुटलेला फोटो केला शेअर appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जहरी टीका केली आहे. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आव्हाडांच्या सुटलेल्या ढेरीचा उल्लेख केला होता. अजित पवारांच्या या पत्रकार परिषदेला जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटरवरुन जोरदार प्रत्युत्तर दिला आहे. (Jitendra awhad on Ajit Pawar) जितेंद्र आव्हाड अजित पवारांचा …
The post जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर जहरी टीका, ढेरी सुटलेला फोटो केला शेअर appeared first on पुढारी.