Pune : आंबेगावात कांदा रोपांचा तुटवडा
पारगाव : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामातील कांदा लागवडी वेगात सुरू झाल्या आहेत. परंतु या परिसरात यंदा कांदा रोपांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकर्यांच्या लागवडी खोळंबल्या आहेत. शेतकरी शेजारच्या जुन्नर, शिरूर, खेड या तालुक्यांमध्ये जाऊन कांदा रोपांची खरेदी करू लागले आहेत. तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वच गावांमध्ये कांदा हे प्रमुख पीक म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेतात. गतवर्षीच्या साठविलेल्या कांद्यांना उच्चांकी बाजारभावाची साथ मिळाली, परंतु या बाजारभावाचा लाभ कमीच शेतकर्यांना मिळाला. दूषित हवामानामुळे अनेक शेतकर्यांचे साठवलेले कांदे सडून गेले. कांद्यांना बाजारभाव अधिक मिळेल या आशेने अनेक शेतकर्यांनी यंदाही कांदा लागवडी सर्वाधिक क्षेत्रात करण्याचे ठरवले आहे.
गेल्या महिन्यापासून पारगाव, शिंगवे, वळती, नागापूर, थोरांदळे आदी परिसरात कांदा लागवडी सुरू आहेत, परंतु कांदा रोपांचा तुटवडा निर्माण झाला आहे. या भागातील शेतकरी कांदा लागवडीसाठी अगोदर घरगुती पद्धतीने कांदा रोपे तयार करतात. मात्र, कांदा रोपांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला. मागील आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसाने कांदा रोपे झोडपून निघाली. अनेक शेतांमधील कांदा रोपांमध्ये पावसाचे पाणी साचून राहिल्याने ती सडून गेली व पिवळी पडली.
आता लागवडीसाठी रोपांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. रोपे विकत घेण्यासाठी शेतकरी शेजारील जुन्नर, शिरूर, खेड या तालुक्यांमध्ये ये-जा करताना दिसत आहेत, परंतु ज्या शेतकर्यांच्या शेतात कांदा रोपे आहेत, ते शेतकरी रोपांचे भाव अवाच्या सवा सांगत आहेत. या भागात कायमच मजूर टंचाई असल्यामुळे शेतकर्यांनी यापूर्वीच कांदा लागवडी करणार्या महिला मजुरांच्या टोळ्या
बुकिंग केल्या आहेत. आता लागवडीसाठी कांदा रोपेच नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
हेही वाचा :
Jalgaon Crime : महिलांनीच महिलांना घेरले, दाग-दागिने घेऊन झाल्या पसार
Bihar Bank Loot : बिहारमध्ये बँक दरोड्याचा थरार; कर्मचाऱ्यांसह ग्राहक ओलीस ठेवत १६ लाखांची लूट
The post Pune : आंबेगावात कांदा रोपांचा तुटवडा appeared first on पुढारी.
पारगाव : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामातील कांदा लागवडी वेगात सुरू झाल्या आहेत. परंतु या परिसरात यंदा कांदा रोपांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकर्यांच्या लागवडी खोळंबल्या आहेत. शेतकरी शेजारच्या जुन्नर, शिरूर, खेड या तालुक्यांमध्ये जाऊन कांदा रोपांची खरेदी करू लागले आहेत. तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वच गावांमध्ये कांदा हे प्रमुख …
The post Pune : आंबेगावात कांदा रोपांचा तुटवडा appeared first on पुढारी.