नागपूर विधानभवनातील राष्ट्रवादीचे कार्यालय अजित पवार गटाकडे
पुढारी ऑनलाईन डेस्क : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर विधानभवनातील राष्ट्रवादीचे कार्यालय अजित पवार गटाला देण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतला आहे. महायुतीचे सरकार उद्यापासून (दि.७) नागपुरातील हिवाळी अधिवेशनाला सामोरे जाणार आहे. या सरकारचे हे नागपुरातील शेवटचे हिवाळी अधिवेशन आहे.
अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा मोठा गट २ जुलैला सत्तेत सहभागी झाला. त्यानंतरचे पावसाळी अधिवेशन संभ्रमातच संपले. अधिवेशन काळातच मंत्री झालेले राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या भेटीला गेले. काका-पुतण्यांच्या राजकारणाचा अंदाज बांधण्यातच अधिवेशन संपले. मधल्या काळात मात्र राष्ट्रवादीचा तिढा सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचला. दोन्ही गटांकडून एकमेकांवर शरसंधान केले गेले. त्यामुळे या अधिवेशनात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीचा सामना रंगण्याची शक्यता असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नागपूर विधानभवनातील राष्ट्रवादीचे कार्यालय अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. याचेही पडसाद उद्यापासून सभागृहात उमटण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; अवकाळी, आरक्षणासह शेतकर्यांच्या प्रश्नावर सरकारची कसोटी
किरण लोहार यांच्याकडे ५ कोटींवर अवैध संपत्ती
मुंबईत ‘आंबेडकर सर्किट’ का होऊ नये ?
The post नागपूर विधानभवनातील राष्ट्रवादीचे कार्यालय अजित पवार गटाकडे appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर विधानभवनातील राष्ट्रवादीचे कार्यालय अजित पवार गटाला देण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतला आहे. महायुतीचे सरकार उद्यापासून (दि.७) नागपुरातील हिवाळी अधिवेशनाला सामोरे जाणार आहे. या सरकारचे हे नागपुरातील शेवटचे हिवाळी अधिवेशन आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा मोठा गट २ जुलैला सत्तेत सहभागी झाला. त्यानंतरचे पावसाळी अधिवेशन …
The post नागपूर विधानभवनातील राष्ट्रवादीचे कार्यालय अजित पवार गटाकडे appeared first on पुढारी.