लोणावळा : मराठी पाट्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक

लोणावळा : मराठी पाट्या मुद्द्यावरून लोणावळा शहर मनसे आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपली तरी लोणावळा शहराच्या सुस्त नगर परिषद प्रशासनाने आजपर्यंत येथील इंग्रजी पाट्यांवर कारवाई केलेली नसल्याचे सांगत मनसे कार्यकर्त्यांनी येथील दुकानांच्या पाट्या फोडल्या. नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष मनसेने 24 नोव्हेंबरपासून नगर परिषदकडे शहरातील इंग्रजी पाट्या हटविण्यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र, … The post लोणावळा : मराठी पाट्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक appeared first on पुढारी.
#image_title

लोणावळा : मराठी पाट्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक

लोणावळा : मराठी पाट्या मुद्द्यावरून लोणावळा शहर मनसे आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपली तरी लोणावळा शहराच्या सुस्त नगर परिषद प्रशासनाने आजपर्यंत येथील इंग्रजी पाट्यांवर कारवाई केलेली नसल्याचे सांगत मनसे कार्यकर्त्यांनी येथील दुकानांच्या पाट्या फोडल्या.
नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष
मनसेने 24 नोव्हेंबरपासून नगर परिषदकडे शहरातील इंग्रजी पाट्या हटविण्यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र, नगर परिषदेने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगत मनसे पदाधिकार्‍यांनी सोमवारी लोणावळा शहरातील दुकानांवर असलेल्या इतर भाषिक पाट्या फोडायला सुरुवात केली. मनसेने अचानक सुरू केलेल्या या तोडफोडीने जाग्या झालेल्या नगर परिषद प्रशासनाने यासंदर्भात मध्यस्थी करीत दुकानदारांना मराठी पाट्या दुकानावर लावण्यासंदर्भात नोटीस दिल्या.
आठ दिवसांसाठी आंदोलन स्थगित
मनसे शहराध्यक्ष भारत रमेश चिकणे यांनी आठ दिवसांची मुदत देत आंदोलन स्थगित केले. मनसेच्या या आंदोलनात चिकणे यांच्यासोबत अमित भोसले, निखिल भोसले, दिनेश कालेकर, सुनील भोंडवे, निखिल सोमण, उमेश बोडके, अभिजित फाजगे, नीलेश लांडगे, संदीप बोभाटे, दीपमाला बोभाटे, विश्रांत साठे, कैवल्य जोशी, विशाल सावंत आदी उपस्थित होते.
हेही वाचा

Pune : जवळेत आढळली रानमांजराची पिले
स्वादुपिंडावरील सूज कशामुळे? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार
जपानी न्यूक्लिअर फ्यूजनमधून निर्माण होणार सूर्यासारखी ऊर्जा

The post लोणावळा : मराठी पाट्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक appeared first on पुढारी.

लोणावळा : मराठी पाट्या मुद्द्यावरून लोणावळा शहर मनसे आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपली तरी लोणावळा शहराच्या सुस्त नगर परिषद प्रशासनाने आजपर्यंत येथील इंग्रजी पाट्यांवर कारवाई केलेली नसल्याचे सांगत मनसे कार्यकर्त्यांनी येथील दुकानांच्या पाट्या फोडल्या. नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष मनसेने 24 नोव्हेंबरपासून नगर परिषदकडे शहरातील इंग्रजी पाट्या हटविण्यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र, …

The post लोणावळा : मराठी पाट्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक appeared first on पुढारी.

Go to Source