बिहारमध्ये बँक दरोड्याचा थरार; कर्मचाऱ्यांसह ग्राहक ओलीस ठेवत १६ लाखांची लूट
पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमधील आरा येथे भरदिवसा बँक लुटल्याची घटना घडली आहे. नवादा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कतीरा मोर येथील अॅक्सिस बँकेत पाच गुन्हेगार घुसले. अवघ्या चार मिनिटांत त्यांनी बँक कर्मचारी व ग्राहकांना ओलीस ठेवून १६ लाखांचा ऐवज लुटून पळ काढला आहे. धक्कादायक बाब म्हणजे दरोडेखोरांनी बँकेला आतून कुलूप लावून पलायन केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Bihar Bank Loot
बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील आरा येथे भरदिवसा अॅक्सिस बँकेच्या शाखेत दरोडा पडला आहे. चार दरोडेखोरांनी शस्त्रे घेऊन बँकेत घुसून कॅश काउंटर आणि व्यवस्थापकाच्या केबिनचा ताबा घेतला. दरम्यान, दरोड्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस बँकेबाहेर पोहोचले. मात्र, दरोडेखोरांनी बँकेच्या गेटला कुलूप लावून शटर बंद केले. व दरोडेखोरांनी बँक कर्मचारी व ग्राहकांना ओलीस ठेवले. Bihar Bank Loot
पोलिसांकडून गुन्हेगारांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले आहे. ही घटना नवादा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अॅक्सिस बँकेत घडली. बँकेत दरोडेखोर घुसल्याच्या वृत्तानंतर लोकांची मोठी गर्दी केली आहे. काही वेळातच एएसपी, नवाडा, टाऊन पोलिस स्टेशनसह डीआययू टीम बँकेबाहेर दाखल झाली आहे . पोलिसांच्या पथकाने बँकेला बाहेरून घेराव घातला आहे. पोलिसांकडून दरोडेखोरांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले जात आहे. ओलिसांना कोणत्याही परिस्थितीत सुखरूप बाहेर काढण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा
Senthil Kumar : ‘गोमूत्र’ वक्तव्यानंतर मोठा वाद, DMK खासदार सेंथिलकुमार यांचा माफीनामा
Cross-border love story : प्रियकराशी विवाह करण्यासाठी पाकिस्तानी महिला भारतात दाखल
Cyclone Michaung | मिचाँग चक्रीवादळ कमकुवत, पण पूरग्रस्त चेन्नईत वीज, इंटरनेट सेवा ठप्पच
The post बिहारमध्ये बँक दरोड्याचा थरार; कर्मचाऱ्यांसह ग्राहक ओलीस ठेवत १६ लाखांची लूट appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमधील आरा येथे भरदिवसा बँक लुटल्याची घटना घडली आहे. नवादा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कतीरा मोर येथील अॅक्सिस बँकेत पाच गुन्हेगार घुसले. अवघ्या चार मिनिटांत त्यांनी बँक कर्मचारी व ग्राहकांना ओलीस ठेवून १६ लाखांचा ऐवज लुटून पळ काढला आहे. धक्कादायक बाब म्हणजे दरोडेखोरांनी बँकेला आतून कुलूप लावून पलायन केले. या घटनेमुळे परिसरात …
The post बिहारमध्ये बँक दरोड्याचा थरार; कर्मचाऱ्यांसह ग्राहक ओलीस ठेवत १६ लाखांची लूट appeared first on पुढारी.