Crime News : मित्राने केलेल्या चाकू हल्ल्यात युवक गंभीर जखमी
वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : पुणे-पानशेत रस्त्यावरील डोणजे गावच्या पायगुडेवाडी येथील निवांत फार्म हाऊसवर सुरू असलेल्या जेवणाच्या पार्टीत किरकोळ वादातून मित्राने केलेल्या चाकू हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला. धीरज मदन शिंदे (वय 26, रा. वडारवाडी, शिवाजीनगर, पुणे) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी हवेली पोलिसांनी हल्लेखोर सागर सोमनाथ शेलार (वय 23, रा. वडारवाडी, शिवाजीनगर, पुणे) याला अटक केली आहे.
हवेली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीम जावेद शेख (रा. शिवाजीनगर, पुणे) याने मुलगा झाला म्हणून डोणजेच्या पायगुडेवाडी येथील निवांत फार्महाऊसवर पार्टी आयोजित केली होती. 15-16 जण शेकोटीभोवती बसले होते. त्या वेळी सागर शेलार व धीरज शिंदे यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले. चिडलेल्या सागर याने चाकूने धीरज शिंदे याच्यावर वार केले. या प्रकरणी हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार तपास करत आहेत. सिंहगड परिसरातील ढाबे, हॉटेल, फार्महाऊस, रिसॉर्टमध्ये राजरोसपणे पार्ट्या सुरू असल्याचे चित्र पुढे आले आहे. त्यास प्रतिबंधक करण्यासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे.
हेही वाचा :
पर्यावरण संवर्धन कागदावरच ; गडकिल्ल्यांना प्लास्टिकचा विळखा
Grape Export : अवकाळीने द्राक्ष निर्यातीला ब्रेक, निर्यातक्षम द्राक्षबाग नोंदणीतही घट
The post Crime News : मित्राने केलेल्या चाकू हल्ल्यात युवक गंभीर जखमी appeared first on पुढारी.
वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : पुणे-पानशेत रस्त्यावरील डोणजे गावच्या पायगुडेवाडी येथील निवांत फार्म हाऊसवर सुरू असलेल्या जेवणाच्या पार्टीत किरकोळ वादातून मित्राने केलेल्या चाकू हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला. धीरज मदन शिंदे (वय 26, रा. वडारवाडी, शिवाजीनगर, पुणे) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी हवेली पोलिसांनी हल्लेखोर सागर सोमनाथ शेलार (वय 23, रा. वडारवाडी, …
The post Crime News : मित्राने केलेल्या चाकू हल्ल्यात युवक गंभीर जखमी appeared first on पुढारी.