हैबतबाबांच्या पायरीचे पूजन, माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्यास प्रारंभ
आळंदी : पुढारी वृत्तसेवा :
तन आमुची मिरासी पंढरी।
विठोबाचे घरी नांदणूक?
सेवा करु नित्य नाचु महाद्वारीं ।
नामाची उजरी जागऊं तेथें ?
साधुसंता शरण जाऊं मनोभावें ।
प्रसाद स्वभावे देती मज?
नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे ।
वरी संत हिरे पायी देती ?
अवघे आयुष्य माउलींच्या सेवेत अर्पण करणार्या संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्याचे जनक गुरुवर्य हैबतबाबांच्या पायरीपूजनाने माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्यास मंगळवारी (दि. 5) प्रारंभ झाला. पंढरपूरमधील संत नामदेव महाराज पायरीप्रमाणेच आळंदीत माउलीचरणी हैबतबाबा यांची पायरी आहे. त्यांच्या परंपरागत पायरीपूजनाने माउलींच्या समाधी सोहळ्याला प्रारंभ होतो.
मंगळवारी पहाटे पवमान अभिषेक व दुधारती, पूजा आदी कार्यक्रम पार पडले. त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता मुख्य महाद्वारासमोरील हैबतबाबांच्या पायरीचे पूजन हैबतबाबांचे वंशज, पालखी सोहळामालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, ऋषिकेश आरफळकर यांच्या हस्ते विधिवत करण्यात आले.
या वेळी संस्थानचे विश्वस्त अॅड. विकास ढगे पाटील, अॅड. राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ, भावार्थ देखणे, केशव महाराज नामदास, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, योगिराज कुर्हाडे, योगेश आरू, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंग गौर, आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे, माजी सभापती डी. डी. भोसले, ज्ञानेश्वर संस्थेचे सचिव अजित वडगावकर, थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. विष्णू तापकीर, राहुल चव्हाण, नंदकुमार वडगावकर, पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे, माऊली गुळुंजकर, मंगेश आरू व आळंदीकर ग्रामस्थ आणि भाविक वारकरी उपस्थित होते.
हेही वाचा :
जपानी न्यूक्लिअर फ्यूजनमधून निर्माण होणार सूर्यासारखी ऊर्जा
करणी सेना अध्यक्षांची हत्या जमिनीच्या वादातून : पोलिसांचा संशय
The post हैबतबाबांच्या पायरीचे पूजन, माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्यास प्रारंभ appeared first on पुढारी.
आळंदी : पुढारी वृत्तसेवा : तन आमुची मिरासी पंढरी। विठोबाचे घरी नांदणूक? सेवा करु नित्य नाचु महाद्वारीं । नामाची उजरी जागऊं तेथें ? साधुसंता शरण जाऊं मनोभावें । प्रसाद स्वभावे देती मज? नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे । वरी संत हिरे पायी देती ? अवघे आयुष्य माउलींच्या सेवेत अर्पण करणार्या संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी …
The post हैबतबाबांच्या पायरीचे पूजन, माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्यास प्रारंभ appeared first on पुढारी.