डिसेंबर आधी बारावा नव्हे दहावा महिना होता!

नवी दिल्ली : इंग्रजी महिन्यांच्या वर्षातील सर्वात अखेरचा म्हणजेच 12 वा महिना म्हणूनही डिसेंबर महिन्याचा उल्लेख होतो. पण, तुम्हाला माहिती आहे का, हा महिना आधीपासून 12 व्या स्थानी नव्हता. त्याऐवजी त्याचे स्थान दहाव्या महिन्याचे होते! पूर्वी एका वर्षात फक्त दहा महिनेच असायचे. एप्रिलपासून हे वर्ष सुरू होऊन ते डिसेंबरवरच थांबत होतं. पुढे जानेवारी आणि फेब्रुवारी … The post डिसेंबर आधी बारावा नव्हे दहावा महिना होता! appeared first on पुढारी.
#image_title

डिसेंबर आधी बारावा नव्हे दहावा महिना होता!

नवी दिल्ली : इंग्रजी महिन्यांच्या वर्षातील सर्वात अखेरचा म्हणजेच 12 वा महिना म्हणूनही डिसेंबर महिन्याचा उल्लेख होतो. पण, तुम्हाला माहिती आहे का, हा महिना आधीपासून 12 व्या स्थानी नव्हता. त्याऐवजी त्याचे स्थान दहाव्या महिन्याचे होते!
पूर्वी एका वर्षात फक्त दहा महिनेच असायचे. एप्रिलपासून हे वर्ष सुरू होऊन ते डिसेंबरवरच थांबत होतं. पुढे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांना या यादीत स्थान देण्यात आलं. इसवी सनपूर्व 690 मध्ये पोम्पिलियसनं हिवाळा संपून मार्च महिना सुरू होण्यादरम्यानच्या काळात साजरा केल्या जाणार्‍या सोहळ्याला ‘फब्रुआ’ असं नाव दिलं. तिथंच फेब्रुवारी हा महिना जन्माला आला. जाणून आश्चर्य वाटेल, पण वर्षातला सर्वात पहिला म्हणजेच जानेवारी महिना दिनदर्शिकेत सर्वात शेवटी जोडण्यात आला होता.
‘जेनस’ हा प्रारंभ आणि अंताचा देवता मानला जातो. त्यामुळं वर्षाच्या सुरुवातीला त्याला हे स्थान देत डिसेंबरनंतर पुन्हा जानेवारीपासून वर्षाची सुरुवात करण्यात आली. डिसेंबर महिन्यात आपण वर्षाला निरोप देतो आणि जानेवारी महिन्यात नव्या वर्षाचं स्वागत करतो. या महिन्याचं नाव लॅटिनमधील डेका शब्दावरून आला असून, त्याचा अर्थ होतो ‘दहा’. गतकाळात हा महिना वर्षाच्या शेवटीच येत होता आणि त्याचा नावानिशी अर्थही ‘दहा’ होत होता. आहे की नाही गंमत?
The post डिसेंबर आधी बारावा नव्हे दहावा महिना होता! appeared first on पुढारी.

नवी दिल्ली : इंग्रजी महिन्यांच्या वर्षातील सर्वात अखेरचा म्हणजेच 12 वा महिना म्हणूनही डिसेंबर महिन्याचा उल्लेख होतो. पण, तुम्हाला माहिती आहे का, हा महिना आधीपासून 12 व्या स्थानी नव्हता. त्याऐवजी त्याचे स्थान दहाव्या महिन्याचे होते! पूर्वी एका वर्षात फक्त दहा महिनेच असायचे. एप्रिलपासून हे वर्ष सुरू होऊन ते डिसेंबरवरच थांबत होतं. पुढे जानेवारी आणि फेब्रुवारी …

The post डिसेंबर आधी बारावा नव्हे दहावा महिना होता! appeared first on पुढारी.

Go to Source