बारामतीत दिव्यांग दिनानिमित्त मतदार नोंदणी
बारामती : पुढारी वृत्तसेवा : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शहरातील गुणवडी चौक येथे दिव्यांग बांधवांसाठी मतदार नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व शाल वाटप करण्यात आले.
उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, निवासी नायब तहसीलदार विलास करे, पंचायत समिती दिव्यांग कल्याण कक्षाचे संदीप शिंदे, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, जागृती दिव्यांग विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष दीपक गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांना मिळणारा मतदानाचा हक्क, त्यांना मतदानाच्या दिवशी मिळणार्या सोयीसुविधांबाबत नावडकर यांनी माहिती दिली. भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने घोषित करण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी मोहीम सुरू असून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
शिंदे यांनी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्याचा उद्देश, दिव्यांगांसाठीच्या केंद्र व राज्य शासनाच्या योजना, शिष्यवृत्ती, निर्वाहभत्ता, आधार कार्ड तसेच नवीन दिव्यांगत्व प्रमाणपत्र काढण्याबाबत माहिती दिली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे तपासणी करून दिव्यांगत्व प्रमाणपत्र व आधार कार्ड देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असेही शिंदे म्हणाले. दिव्यांग मतदार नोंदणीकरिता 60 अर्ज वाटप करण्यात आले तसेच जागृती दिव्यांग संस्थेच्या वतीने 17 दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शाल वाटप करण्यात आले. दिव्यांग ऑलिम्पिक स्पर्धेत निवड झाल्याबद्दल दिशा साळवे हिचा सत्कार करण्यात आला.
हेही वाचा :
Nashik News : 68 वर्षात अशी गारपीट पाहिली नाही, थरथरत्या हातांनी चालवली कुऱ्हाड
100 Chinese Websites Banned | मोदी सरकारची मोठी कारवाई, १०० चीनी वेबसाइट्स केल्या ब्लॉक
The post बारामतीत दिव्यांग दिनानिमित्त मतदार नोंदणी appeared first on पुढारी.
बारामती : पुढारी वृत्तसेवा : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शहरातील गुणवडी चौक येथे दिव्यांग बांधवांसाठी मतदार नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व शाल वाटप करण्यात आले. उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, निवासी नायब तहसीलदार विलास करे, पंचायत समिती दिव्यांग कल्याण कक्षाचे संदीप शिंदे, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, जागृती …
The post बारामतीत दिव्यांग दिनानिमित्त मतदार नोंदणी appeared first on पुढारी.