सुहाना खान स्टनिंग लूकमध्ये!; ‘द आर्चीज’ चा प्रीमियर

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना खानचा ‘द आर्चीज’ ( The Archies Premiere Suhana Khan ) चित्रपट घेवून येत आहे. या चित्रपटात सुहाना खानसोबत अगस्त्य नंदा, वेदांग रैना, खुशी कपूर, मिहिर आहुजा आणि अदिती डॉट या कलाकारांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. ‘द आर्चीज’ हा चित्रपट येत्या ७ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित … The post सुहाना खान स्टनिंग लूकमध्ये!; ‘द आर्चीज’ चा प्रीमियर appeared first on पुढारी.
#image_title
सुहाना खान स्टनिंग लूकमध्ये!; ‘द आर्चीज’ चा प्रीमियर


पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना खानचा ‘द आर्चीज’ ( The Archies Premiere Suhana Khan ) चित्रपट घेवून येत आहे. या चित्रपटात सुहाना खानसोबत अगस्त्य नंदा, वेदांग रैना, खुशी कपूर, मिहिर आहुजा आणि अदिती डॉट या कलाकारांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. ‘द आर्चीज’ हा चित्रपट येत्या ७ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान नुकतेच या चित्रपटाचा एक भव्य प्रीमियर मुंबईत आयोजित करण्यात आला होते. या खास सोहळ्यास शाहरूख खान फॅमिलीसोबत अभिषेक बच्चन कुंटूबियदेखील पोहोचले होते. मात्र, शाहरूखची मुलगी सुहाना खानच्या स्टनिंग लूकची जोरदार चर्चा झाली. या सोहल्यातील खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
संबंधित बातम्या 

‘श्रीमद् रामायण’ लवकरचं, अभिनेता सुजय रेऊ प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत
Deepika Padukone Fighter Poster : स्क्वॉड्रन लीडर मीनल राठौडच्या भूमिकेत दीपिका पादुकोण
Animal Actress Tripti Dimri : इंटिमेट सीन देणारी तृप्ती डिमरी आहे तरी कोण?

विरल भयानी इन्स्टाग्राम अंकाऊंटवर ‘द आर्चीज’ चित्रपटाच्या प्रीमियर सोहळ्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत अभिनेता शाहरुख खान, गौरी खान, आर्यन खान, सुहाना खान आणि अबराम खान यांनी पापाराझीच्या कॅमेऱ्याला हटके पोज दिली. यावेळी आर्यन आणि शाहरुख खान ब्लॅक सूटमध्ये दिसला. तर सुहानाने रेड कलरचा वनपीस परिधान केला आहे. यावेळी सुहानाचा हा स्टनिंग लूकमध्ये खूपच ग्लॅमरस दिसतेय. याशिवाय पिता-पुत्र जोडीला चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव करताना कॉमेन्टचा पाऊस पाडलाय. या व्हिडिओला आतापर्यत १ लाख २६ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. दरम्यान युजर्सनी ‘अबराम खूपच क्युट दिसतोय’, ‘सुहाना थोडी घाबरली असून शाहरूखने तिच्या हाताला धरले आहे’ अशा कॉमेन्टस केल्या आहेत. तर दुसऱ्या एका युजर्सने आर्यन खानला हसण्याचा सल्ला दिला आहे. ( The Archies Premiere Suhana Khan )

 

View this post on Instagram

 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

The post सुहाना खान स्टनिंग लूकमध्ये!; ‘द आर्चीज’ चा प्रीमियर appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना खानचा ‘द आर्चीज’ ( The Archies Premiere Suhana Khan ) चित्रपट घेवून येत आहे. या चित्रपटात सुहाना खानसोबत अगस्त्य नंदा, वेदांग रैना, खुशी कपूर, मिहिर आहुजा आणि अदिती डॉट या कलाकारांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. ‘द आर्चीज’ हा चित्रपट येत्या ७ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित …

The post सुहाना खान स्टनिंग लूकमध्ये!; ‘द आर्चीज’ चा प्रीमियर appeared first on पुढारी.

Go to Source