चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर

चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यातील वहानगाव येथील सुभाष दोडके यांच्या शेतशिवारात दोन वाघांच्या झुंजी लागल्या होत्या. या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (दि.१४) दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे.
चिमूर तालुक्यातील  खडसंगी प्रादेशिक वनपरिक्षेत्र अंतर्गत वहानगाव शेतशिवरात दोन वाघांची झुंज झाली. यामध्ये एका वाघाचा मृत्यू झाला तर दुसरा वाघ गंभीर जखमी झाला आहे. गंभीर जखमी झाल्याने दुसरा वाघ घटनास्थळीच बसून आहे. आज मंगळवारी वहानगाव येथील सुभाष दोडके यांच्या शेतात ही घटना दुपारी निदर्शनास आली. या घटनेची माहिती मिळताच वाघांना बघण्यासाठी घटनास्थळी शेकडो लोकांनी गर्दी केली. मृत वाघ नर असून अडीच वर्षाचा होता.
खडसंगी प्रादेशिक वनविभागातील शेतशिवरात बरेच दिवसांपासून वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. वहानगाव शेतशिवारात सात बैलासह एका गाईला या वाघांनी ठार केले आहे.तेव्हापासून वाघाचा नेहमीच या शेतशिवारात वावर सुरू होता. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चिमूर तालुक्याला लागून आहे. त्यामुळे बफर क्षेत्र असो किंवा प्रादेशिक वनविभाग असो वाघाचा वावर नित्याचा झालेला आहे. आज दुपारच्या सुमारास दोन वाघांची झुंज सुभाष दोडके यांच्याच शेतात झाली. ही झुंज इतकी भयंकर होती की, या झालेल्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या वाघाची स्थिती गंभीर दिसून येत होती. घटनेची माहिती मिळताच  प्रादेशिक वन विभागाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.त्यानंतर मृत वाघाला खडसंगी वनविभागाच्या विश्रामगृहात उत्तरीय तपासणी पाठविण्यात आले.
हेही वाचा : 

Nashik crime news : घोटी येथे डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल
अलुवा बालिका अत्‍याचार आणि हत्या प्रकरणातील नराधमास फाशीची शिक्षा
रत्नागिरी : वांद्रीत अंगावर गरम पाणी पडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

The post चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर appeared first on पुढारी.

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यातील वहानगाव येथील सुभाष दोडके यांच्या शेतशिवारात दोन वाघांच्या झुंजी लागल्या होत्या. या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (दि.१४) दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. चिमूर तालुक्यातील  खडसंगी प्रादेशिक वनपरिक्षेत्र अंतर्गत वहानगाव शेतशिवरात दोन वाघांची झुंज झाली. यामध्ये एका वाघाचा …

The post चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर appeared first on पुढारी.

Go to Source