सातारा : दिशाच्या मृत्यूनंतर आजोबांनीही सोडला प्राण
खेड; पुढारी वृत्तसेवा : संगमनगर येथील रस्त्यावर रविवारी ट्रकने दुचाकीला धडक दिली होती. यामध्ये दिशा घोरपडे या युवतीचा मृत्यू झाला. यानंतर घोरपडे कुटुंबियांवर शोककळा पसरली असतानाच त्यांना आणखी धक्का सहन करावा लागला. दिशाच्या मृत्यूच्या धक्क्याने आजोबा दत्तात्रय मारूती शिंदे (वय 50 रा. सोनगाव सं. निब ता. सातारा) यांनीही प्राण सोडला. त्यांचे दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी हृदयविकाराने निधन झाले.
सातारा – कोरेगाव रस्त्यावर संगमनगर येथे दिशाला ट्रकने चिरडल्याने तिचा मृत्यू झाला. दिशा ही दत्तात्रय शिंदे यांच्या सख्ख्या चुलतभावाच्या मुलीची मुलगी होती. दिशा वारंवार आजोळी सोनगाव येथे येत होती. शनिवारी ती आल्यानंतर दत्तात्रय शिंदेंनाही भेटली होती. दिशा त्यांच्यासह सर्वच कुटुंबाची लाडकी होती. तिच्या अचानक मृत्यूमुळे आजोळही शोकसागरात बुडाले. दिशावर शिरढोण या तिच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या दत्तात्रय शिंदे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. दिशा आजी व आजोबांकडे नेहमी वास्तव्यास असायची. घोरपडे व शिंदे कुटुंबावर कोसळलेल्या हृदयद्रावक प्रसंगांमुळे सोनगाव व शिरढोण या गावावर शोककळा पसरली आहे.
The post सातारा : दिशाच्या मृत्यूनंतर आजोबांनीही सोडला प्राण appeared first on पुढारी.
खेड; पुढारी वृत्तसेवा : संगमनगर येथील रस्त्यावर रविवारी ट्रकने दुचाकीला धडक दिली होती. यामध्ये दिशा घोरपडे या युवतीचा मृत्यू झाला. यानंतर घोरपडे कुटुंबियांवर शोककळा पसरली असतानाच त्यांना आणखी धक्का सहन करावा लागला. दिशाच्या मृत्यूच्या धक्क्याने आजोबा दत्तात्रय मारूती शिंदे (वय 50 रा. सोनगाव सं. निब ता. सातारा) यांनीही प्राण सोडला. त्यांचे दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी हृदयविकाराने निधन …
The post सातारा : दिशाच्या मृत्यूनंतर आजोबांनीही सोडला प्राण appeared first on पुढारी.