लातूरमधील ‘या’ गावात आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी

पानगांव; विष्णु आचार्य : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी येथे असलेल्या पवित्र ‘अस्थींना ‘ अभिवादन करण्याकरीता ६ डिंसेबर रोजी परिसरातील लाखो आंबेडकरी अनुयायी अभिवादनाकरीता येत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘अस्थी’ असलेले पानगांव (ता. रेणापूर, जि.लातूर) म्हणजे मराठवाड्यातील आंबेडकरी अनुयायींचे शक्ती केंद्रच आहे. ६ डिसेंबर १९५६ रोजी बहुजणांचे मुक्ती दाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे … The post लातूरमधील ‘या’ गावात आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी appeared first on पुढारी.
#image_title
लातूरमधील ‘या’ गावात आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी


पानगांव; विष्णु आचार्य : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी येथे असलेल्या पवित्र ‘अस्थींना ‘ अभिवादन करण्याकरीता ६ डिंसेबर रोजी परिसरातील लाखो आंबेडकरी अनुयायी अभिवादनाकरीता येत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘अस्थी’ असलेले पानगांव (ता. रेणापूर, जि.लातूर) म्हणजे मराठवाड्यातील आंबेडकरी अनुयायींचे शक्ती केंद्रच आहे.
६ डिसेंबर १९५६ रोजी बहुजणांचे मुक्ती दाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले. आंबेडकरी अनुयांयीसह सारा देश शोकसागरात बुडाला. बाबासाहेबांच्या निर्वाणाची बातमी आकाशवाणी रेडीओ वरून प्रसारीत करण्यात आली. ही दुखःद बातमी पानगांव येथील येसकर असलेल्या ग्यानबा आचार्य (शिंगाडे) यांना गावात रात्री घरोघरी जाऊन भाकरी मागत असताना राघोपंत कुलकर्णी यांनी ‘तुमच्या बाबासाहेबांचा मृत्यू झाला,’ असे सांगताच त्याने भाकरी न मागताच तसाच रडत-रडतच महारवाडयात येवून आपले बाबासाहेब गेल्याचे सांगितले. ही बातमी खरी आहे की नाही, याची खात्री करण्याकरीता काहीजण राघोपंताच्या घरी गेले व बातमी खरी असल्याचे समजताच वस्तीत जणू घरातीलच कोणी वारल्यासारखे सर्वजण मोठमोठयाने रडू लागले. जमलेल्यांपैकी लिंबाजी आचार्य यांनी रडत- रडतच मी मुंबईला जाऊन बांबाचे अंतिम दर्शन घेणार असल्याचे सांगितले. तेंव्हा तिथे असलेले दगडू आचार्य, प्रभाकर आचार्य, किशन आचार्य, वैजनाथ आचार्य, सुर्यभान आचार्य, यादव आचार्य हेही मुंबईकडे निघाले.
पानगांवहून त्यावेळी लातूरला जाण्याकरिता कसलीही सोय नव्हती तरीही रात्री १० वाजेच्या सुमारास पायी- पायी निघून ते चालत-चालत १२ ते १२.३० वाजता लातूरच्या रेल्वे स्थानकावर पोहचले. लातुरहून सकाळी कुर्डवाडी पर्यंत रेल्वे असल्याचे समजले सर्वांनी प्लॅटफार्मवरच बसुन रात्र काढली. सकाळी रेल्वेने कुर्डवाडी-पुणे-मुंबई प्रवास करत दादर मुंबई गाठली. शेवटी जिथे अग्नी दिला होता त्या ठिकाणी जाऊन अखेरचे दर्शन घ्यावे म्हणुन तिकडे सर्वजण निघाले.
जिथे बाबासाहेबांना अग्नी दिला होता त्या जागेवर केवळ त्यांच्या शरीराची राखच उरली होती. त्याच राखेचा टिळा कपाळावर लाऊन त्यांनी आपल्या मुक्तीदात्यांना अखेरचे नतमस्तक होऊन अभिवादन केले. सर्वजण तेथून निघाले, येताना सर्वांची नजर चुकवून लिंबाजी आचार्य यांनी राखेत हात घालुन मुठभर राख मुठीत घेत ती मुठ तशीच खिशात घालून तिथून निघाले.
दादरच्या रेल्वे स्टेशनवर आले. तिथे आल्यावर लिंबाजीने सोबत असणाऱ्यांना अस्थी आणल्याचे सांगितले. तेव्हा सर्वजण अंचबीत होऊन त्याच्याकडे पाहू लागले. आता या अस्थींचे काय करायचे म्हणून सर्वजण विचार करू लागले. विचाराअंती त्या अस्थी पानगांवला आणल्या. गावात अस्थी आणल्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना घेऊन सार्वजनिक ३०x३० च्या जागेत सुरक्षित पुरुन ठेवल्या. आजही सुरक्षितरित्या त्याच जागेवर आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी कलशाला अभिवादन करण्याकरिता ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी मराठवाडयासह सिमावर्ती आंध्र प्रदेश, तेंलगना, कर्नाटक भागातून लाखो आंबेडकरी आनुयांयी अभिवादनाकरिता येत आपल्या मुक्तीदात्याला नमन करीत असतात. बाबासाहेबांचे १९५६ पासुन चैत्य (अस्थी) असलेली जागा पवित्र समजली जाते. पानगाव हे आंबेडकरी आनुयायांयीचे धार्मिक शक्ती केंद्र म्हणून ओळखले जात आहे.
The post लातूरमधील ‘या’ गावात आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी appeared first on पुढारी.

पानगांव; विष्णु आचार्य : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी येथे असलेल्या पवित्र ‘अस्थींना ‘ अभिवादन करण्याकरीता ६ डिंसेबर रोजी परिसरातील लाखो आंबेडकरी अनुयायी अभिवादनाकरीता येत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘अस्थी’ असलेले पानगांव (ता. रेणापूर, जि.लातूर) म्हणजे मराठवाड्यातील आंबेडकरी अनुयायींचे शक्ती केंद्रच आहे. ६ डिसेंबर १९५६ रोजी बहुजणांचे मुक्ती दाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे …

The post लातूरमधील ‘या’ गावात आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी appeared first on पुढारी.

Go to Source