पुणे : रूपाली चाकणकर यांच्या फेसबुक पोस्टवर अश्लील कमेंट
पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या फेसबुक पोस्टवर अश्लील कमेंट करणार्या जयंत रामचंद्र पाटील (रा. धनगरवाडी, सांगली), वसंत रमेशराव खुळे (वय 34, रा. रहाटी, जि. परभणी), प्रदीप कणसे (रा. पुणे) यांना पुणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दरम्यान, तिघांचे मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
याप्रकरणी रूपाली चाकणकर यांचे भाऊ संतोष बबन बोराटे यांनी 19 ऑक्टोबर 2023 रोजी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या फेसबुक पोस्टवर विकास सावंत, जयंत पाटील, रणजितराजे हत्तीमबिरे, अमोल पाटील या फेसबुक खात्यावरून अश्लील कमेंट करण्यात आली. यानंतर तांत्रिक माहितीद्वारे रणजितराजे हत्तीमबिरे, अमोल पाटील हे खाते सांभाळणार्या संशयितांच्या मोबाईल नंबरची माहिती सायबर पोलिसांना मिळाली.
त्याला ताब्यात घेऊन तपास केला असता तो मानसिक रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल सुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्नेहल अडसूळ, विद्या साबळे, पोलिस अंमलदार संतोष जाधव, दिनेश मरकड, सुनील सोनेणे, उमा पालवे यांच्या पथकाने केली.
सोशल मीडियावर महिलांसंदर्भात बदनामीकारक, अश्लील लिहिल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारे कोणी कमेंट, बदनामीकारक मजूकर लिहित असेल तर तक्रार करण्यासाठी महिलांनी पुढे यायला हवे.
– रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे)
हेही वाचा
मराठा आरक्षणाबाबत अपेक्षित काम नसल्यानेच सदस्यांचे राजीनामे : अतुल सावे
महिलांवरील अत्याचारांमध्ये युपी पुढे; महाराष्ट्र दुसरा
7/12 महागला; फेरफारलाही पैसे?
The post पुणे : रूपाली चाकणकर यांच्या फेसबुक पोस्टवर अश्लील कमेंट appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या फेसबुक पोस्टवर अश्लील कमेंट करणार्या जयंत रामचंद्र पाटील (रा. धनगरवाडी, सांगली), वसंत रमेशराव खुळे (वय 34, रा. रहाटी, जि. परभणी), प्रदीप कणसे (रा. पुणे) यांना पुणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दरम्यान, तिघांचे मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्यांची चौकशी करण्यात येत आहे. …
The post पुणे : रूपाली चाकणकर यांच्या फेसबुक पोस्टवर अश्लील कमेंट appeared first on पुढारी.