तरूणांमध्ये वाढतोय हार्टअॅटॅक

देशातील युवकांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढला आहे. हार्टअॅटॅकने अलीकडच्या काळात अनेक तरुणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची गांभीर्याने दखल घेतली आहे. बुधवारी (दि. 6) सकाळी 9.30 मिनिटांनी देशातील 10 लाख लोकांना हृदयविकारापासून काळजी घेण्याबाबतचे चेक ऑफ रिस्पान्सचे (सीपीआर) प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी शाळा, जीम आणि महाविद्यालयांत प्रशिक्षण देण्यात येणार
नाक, गळा तपासणार, श्वासोच्छ्वासात अडथळा आहे का, याची तपासणी केली जाईल
छातीवर दाब देण्यासंदर्भातील तंत्राची माहिती मिळेल;यामुळे पुन्हा हृदय सुरळीत होऊ शकते
छातीवर दोन्ही हाताने दाबून पंपिंग केल्याने हृदयाचे ठोक सुरळीत होतील
जीवनशैली
जीवनशैलीतील बदलामुळे हृदयविकाराचा धोका वाढत आहे. अनियमित जेवण, धूम्रपान, मद्यपान, व्यायामाचे प्रमाण कमी आदी कारणांमुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे.
लठ्ठपणा
तरुणांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. लठ्ठ मुलांमध्ये हा धोका सर्वाधिक असतो. रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, मधुमेह आदींमुळेही कार्डियाक हार्टअॅटॅकचे प्रमाण वाढत आहे.
लक्षणे
घाम येणे
ठोक्यांची गती असामान्य
डाव्या छातीत वेदना होणे
श्वासोच्छ्वासात अडथळा
बेशुद्ध होणे
जेनेटिक फॅक्टर
आनुवंशिक कारणामुळेही हृदयविकाराचा धोका संभवतो. कुटुंबातील व्यक्तीस त्रास असल्यास धोका वाढण्याची शक्यता असते.
The post तरूणांमध्ये वाढतोय हार्टअॅटॅक appeared first on पुढारी.
देशातील युवकांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढला आहे. हार्टअॅटॅकने अलीकडच्या काळात अनेक तरुणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची गांभीर्याने दखल घेतली आहे. बुधवारी (दि. 6) सकाळी 9.30 मिनिटांनी देशातील 10 लाख लोकांना हृदयविकारापासून काळजी घेण्याबाबतचे चेक ऑफ रिस्पान्सचे (सीपीआर) प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी शाळा, जीम आणि महाविद्यालयांत प्रशिक्षण देण्यात येणार नाक, गळा …
The post तरूणांमध्ये वाढतोय हार्टअॅटॅक appeared first on पुढारी.
