वाशीम जवळील काटा येथील जाहीर सभेतुन मराठा ओबीसी समाजाला एकजूट राहण्याचा सल्ला
वाशिम; पुढारी वृत्तसेवा : गेल्या 70 वर्षांपासुन मराठा समाज आरक्षणासाठी लढत असुन समाजाचा हा लढा अंतीम टप्पयात आहे. त्यामुळे विरोधकांच्या टिकेवर कुठलीही प्रतिक्रीया न देता आरक्षण मिळेपर्यंत शांत राहण्याचा सल्ला मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी वाशीम जवळील काटा येथील जाहीर सभेतुन मराठा ओबीसी समाजाला दिला. काटा येथील लालबहादुर शास्त्री विद्यालयाच्या मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या विराट सभेचे आयोजन सकल मराठा समाजाच्यावतीने दिनांक 5 डिसेंबर रोजी करण्यात आले होते.
दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांना मराठा-ओबीसी वाद पेटवुन आपली राजकीय महत्वाकांक्षा पुर्ण करायची असुन ठिकठिकाणी ओबीसी बांधवांना पुढे करून छगन भुजबळ वाद निर्माण करीत आहेत. मात्र मराठा समाजातील तरूणांनी आरक्षण मिळेपर्यंत अपमान सहन करण्याचा महत्वाचा सल्ला जरांगे यांनी आपल्या संबोधनातुन दिला. आरक्षण मिळाल्यावर बॅनर फाडणाऱ्यांना जसेच्या तसे उत्तर देण्यात येईल असा ईशारा जरांगे यांनी आपले जाहीर सभेतुन दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजीत पवारांनी छगन भुजबळ यांना समजावुन सांगावे. अन्यथा मराठयांच्या नादाला लागल्यास त्याचे विपरीत परिणाम सरकारला भोगावे लागतील असे जरांगे आपल्या भाषणातुन म्हणाले.
अकोला जिल्यातील चरणगांव येथील सभा आटपुन जरांगे पाटील वाशीमकडे येत असतांना महामार्गावर काळे झेंडे दाखवुन ओबीसी बांधवाकडुन जरांगे यांचा निषेध करण्यात आला. या आंदोलनाला उत्तर देताना जरांगे यांनी छगन भुजबळ यांचा ऐकरी उल्लेख करीत खरपुस समाचार घेतला. सांयकाळी 4 वाजुन 45 मिनटांनी जरांगे यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. तत्पुर्वी वाशीम व ईतर जिल्यातुन आलेल्या मराठा बांधवांनी, मनोज जरांगे यांच्या रूपात मराठा समाजाला कित्येक वर्षांनंतर नेतृत्व लाभले असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाला निश्चीतच आरक्षण मिळेल असा आशावाद आपल्या भाषणातुन व्यक्त केला. दरम्यान वाशीम जिल्यातील तब्बल 50 हजारा मराठा समाज बांधवांची या विराट सभेला उपस्थिती होती. या विराट सभेचे सुजसंचालन प्रा.गजानन वाघ आणि डॉ.विजय काळे यांनी तर आभार प्रदर्शन विरेंद्र देशमुख यांनी केले. राष्ट्रगीताने या जाहीर सभेचे सांगता करण्यात आली..
The post वाशीम जवळील काटा येथील जाहीर सभेतुन मराठा ओबीसी समाजाला एकजूट राहण्याचा सल्ला appeared first on पुढारी.
वाशिम; पुढारी वृत्तसेवा : गेल्या 70 वर्षांपासुन मराठा समाज आरक्षणासाठी लढत असुन समाजाचा हा लढा अंतीम टप्पयात आहे. त्यामुळे विरोधकांच्या टिकेवर कुठलीही प्रतिक्रीया न देता आरक्षण मिळेपर्यंत शांत राहण्याचा सल्ला मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी वाशीम जवळील काटा येथील जाहीर सभेतुन मराठा ओबीसी समाजाला दिला. काटा येथील लालबहादुर शास्त्री विद्यालयाच्या मैदानात मनोज जरांगे …
The post वाशीम जवळील काटा येथील जाहीर सभेतुन मराठा ओबीसी समाजाला एकजूट राहण्याचा सल्ला appeared first on पुढारी.