विराट कोहली उपांत्य फेरीत रचणार ‘हे’ 2 मोठे विक्रम!

विराट कोहली उपांत्य फेरीत रचणार ‘हे’ 2 मोठे विक्रम!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat kohli New Record : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या साखळी सामन्यांमध्ये भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली. आता बुधवारी (15 नोव्हेंबर) उपांत्य फेरीत टीम इंडियाची लढत न्यूझीलंडशी होणार आहे. स्पर्धेत शानदार कामगिरी करणा-या विराट कोहलीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. या विश्वचषकात किंग कोहलीने 9 सामन्यात 99 च्या सरासरीने 594 धावा केल्या आहेत. यादरम्यान, त्याने 2 शतके, 5 अर्धशतकेही झळकावली आहेत. उपांत्य फेरीच्या सामन्यात पुन्हा एकदा कोहलीकडून मोठ्या खेळीची प्रत्येकाला अपेक्षा आहे. जर यशस्वी झाला तर तो जागतिक क्रिकेटमध्ये दोन नवे विक्रम रचणार आहे.
सचिनचे 2 विक्रम कोहलीच्या निशाण्यावर (Virat kohli New Record)
विराटसाठी 2023 ची विश्वचषक स्पर्धा आतापर्यंत चांगली गेली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात फलंदाजीसाठी कठीण खेळपट्टीवरही शतक झळकावण्यात त्याला यश आले. आता उपांत्य फेरीच्या सामन्यात कोहलीने शतक झळकावले तर सचिन तेंडुलकरचे दोन महान विक्रम एकाच डावात मोडून तो जागतिक क्रिकेटमध्ये नवा विक्रम रचेल. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहलीने शतकांच्या बाबतीत सचिनसोबत बरोबरी साधली आहे. या दोघा महान खेळाडूंच्या नावावर 49-49 शतके आहेत. आता कोहली उपांत्य फेरीत शतक झळकावले तर तो 50 वनडे शतके करणारा पहिला खेळाडू ठरेल. या खेळीसह तो विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा करण्याचा सचिनचा विक्रमही मोडेल. 2003 च्या विश्वचषकात सचिनने 673 धावा केल्या होत्या आणि हा आकडा पार करण्यासाठी कोहलीला फक्त 80 धावांची गरज आहे.
वानखेडेमध्ये कोहलीची सरासरी चांगली (Virat kohli New Record)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या मैदानावरील विराट कोहलीचे रेकॉर्ड पाहिले तर ते प्रभावी आहे. वानखेडेवर 7 डावात फलंदाजी करताना कोहलीने आतापर्यंत 59.50 च्या सरासरीने 357 धावा फटकावल्या आहेत. ज्यात एक शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. सन 2017 मध्ये या मैदानावर कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावले होते. मात्र त्या सामन्यात भारतीय संघाला 6 विकेटने पराभव स्वीकारावा लागला होता.
हेही वाचा :

6 Wickets in 6 Balls : एका षटकात 6 विकेट! ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या थरारक कामगिरीने खळबळ
Swabhimani Shetkari Sanghatana protest: ऊसदरात वाढ हवी, मात्र लढाई नको; शेतकऱ्यांमधील दुही कारखानदारांच्या पथ्यावर    
वाळू माफियांनी पीएसआयला चिरडल्‍याप्रकरणी बिहारचे मंत्री म्‍हणाले, “अशा घटना काही नवीन नाहीत”

The post विराट कोहली उपांत्य फेरीत रचणार ‘हे’ 2 मोठे विक्रम! appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat kohli New Record : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या साखळी सामन्यांमध्ये भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली. आता बुधवारी (15 नोव्हेंबर) उपांत्य फेरीत टीम इंडियाची लढत न्यूझीलंडशी होणार आहे. स्पर्धेत शानदार कामगिरी करणा-या विराट कोहलीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. या विश्वचषकात किंग कोहलीने 9 सामन्यात 99 च्या सरासरीने 594 धावा केल्या आहेत. यादरम्यान, …

The post विराट कोहली उपांत्य फेरीत रचणार ‘हे’ 2 मोठे विक्रम! appeared first on पुढारी.

Go to Source