थंडीत दुखऱ्या आणि चिरलेल्या टाचांपासून आराम मिळवण्यासाठी हे उपाय करा

पुढारी ऑनलाईन : दिवाळी संपली कि चाहूल लागते ती थंडीची. थंडीसाठी विशेषणं कितीही गुलाबी असली तरी त्याचे परिणाम मात्र अनेकदा त्रासदायक ठरतात. थंडी हा कोरड्या हवेचा ऋतू म्हणूनही ओळखला जातो. त्वचा, केस, आरोग्य या सर्वांसोबत सगळ्यात जास्त हानी होते ती टाचांची. बऱ्याच जणांच्या टाचा थंडीतील कोरड्या हवेमुळे फुटतात. तर काहीना ही समस्या वर्षभर सतावते. वर्षभर … The post थंडीत दुखऱ्या आणि चिरलेल्या टाचांपासून आराम मिळवण्यासाठी हे उपाय करा appeared first on पुढारी.
#image_title

थंडीत दुखऱ्या आणि चिरलेल्या टाचांपासून आराम मिळवण्यासाठी हे उपाय करा

पुढारी ऑनलाईन : दिवाळी संपली कि चाहूल लागते ती थंडीची. थंडीसाठी विशेषणं कितीही गुलाबी असली तरी त्याचे परिणाम मात्र अनेकदा त्रासदायक ठरतात. थंडी हा कोरड्या हवेचा ऋतू म्हणूनही ओळखला जातो. त्वचा, केस, आरोग्य या सर्वांसोबत सगळ्यात जास्त हानी होते ती टाचांची. बऱ्याच जणांच्या टाचा थंडीतील कोरड्या हवेमुळे फुटतात. तर काहीना ही समस्या वर्षभर सतावते.
वर्षभर ही समस्या असलेल्या व्यक्तींना विटामीन ए, बी आणि सीची कमतरता असण्याची शक्यता असते. याशिवाय सोरायसिस, थायरॉईड हे आजारदेखील टाचा फुटण्यास कारणीभूत ठरतात. तुम्हालाही या थंडीत टाचा फुटणे किंवा त्यातून रक्त येणे या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर पुढील उपाय जरूर ट्राय करा.
आहार परिपूर्ण घ्या :
टाचा फुटण्याचं सगळ्यात महत्त्वाचं तरीही दुर्लक्ष केले जाणारे कारण म्हणजे पोषणमूल्यांची कमतरता. त्यामुळे आहारात विटामीन ए, बी आणि सी असलेल्या पदार्थांचा समावेश करा.
स्क्रब : जे उपाय चेहऱ्याच्या क्लिनिंगसाठी वापरले जातात तेच पायांच्या त्वचेसाठी केले जाणं गरजेचं आहे. टाचेची त्वचा चेहऱ्याच्या त्वचेपेक्षा कठीण असते. त्यामुळे ती स्क्रब करताना वेळ देणं गरजेचं असत. यामुळे टाचेची मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते.
 

 
एलोवेरा जेल (कोरफडीचा गर ) : यानंतर कोमट पाण्याने पाय धुवावेत. पायाला बाजारातून आणलेला किंवा ताजा कोरफडीचा गर लावावा. गर सुकल्यानंतर सॉक्स घालून झोपावं. यामुळे रात्रभर टाचा मऊ होण्यास मदत होते.

नारळाचे / खोबरेल तेल : फुटलेल्या टाचांवरचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे घरी असलेले खोबरेल तेल. रात्री झोपताना हे तेल पायाला लावावे. काहीवेळ मसाज करावा. त्यानंतर सॉक्स घालून झोपावे. काही दिवसांतच फरक जाणवू लागेल.

 
मॉइश्चराईजरचा भरपूर वापर  : टाचा फुटण्याच मूळ त्वचेच्या कोरडेपणात आहे. त्यामुळे टाचेची त्वचा कोरडी न राहू देण्याचा प्रयत्न करा. यासाठी मॉइश्चराईजरचा वापर वरचेवर करा.

The post थंडीत दुखऱ्या आणि चिरलेल्या टाचांपासून आराम मिळवण्यासाठी हे उपाय करा appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन : दिवाळी संपली कि चाहूल लागते ती थंडीची. थंडीसाठी विशेषणं कितीही गुलाबी असली तरी त्याचे परिणाम मात्र अनेकदा त्रासदायक ठरतात. थंडी हा कोरड्या हवेचा ऋतू म्हणूनही ओळखला जातो. त्वचा, केस, आरोग्य या सर्वांसोबत सगळ्यात जास्त हानी होते ती टाचांची. बऱ्याच जणांच्या टाचा थंडीतील कोरड्या हवेमुळे फुटतात. तर काहीना ही समस्या वर्षभर सतावते. वर्षभर …

The post थंडीत दुखऱ्या आणि चिरलेल्या टाचांपासून आराम मिळवण्यासाठी हे उपाय करा appeared first on पुढारी.

Go to Source