‘RIZZ’ हा यावर्षी ऑक्सफर्ड डिक्शनरीत समाविष्ट केलेला सर्वोत्तम शब्द

पुढारी ऑनलाईन डेस्क: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने वर्ड ऑफ द इयर म्हणून ‘रिझ’(RIZZ) हा नवीन शब्द समाविष्ट केला आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने एखाद्याला व्यक्तीला आकर्षित करण्याच्या क्षमतेचे वर्णन किंवा व्यक्तिला मोहात पाडण्यासाठी ‘RIZZ’ लोकप्रिय संकल्पना वापरल्याचे म्हटले आहे. या संदर्भातील वृत्त ‘द हिंदू’ने दिले आहे. (Word Of The Year 2023) ‘द हिंदू’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे … The post ‘RIZZ’ हा यावर्षी ऑक्सफर्ड डिक्शनरीत समाविष्ट केलेला सर्वोत्तम शब्द appeared first on पुढारी.
#image_title
‘RIZZ’ हा यावर्षी ऑक्सफर्ड डिक्शनरीत समाविष्ट केलेला सर्वोत्तम शब्द


पुढारी ऑनलाईन डेस्क: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने वर्ड ऑफ द इयर म्हणून ‘रिझ’(RIZZ) हा नवीन शब्द समाविष्ट केला आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने एखाद्याला व्यक्तीला आकर्षित करण्याच्या क्षमतेचे वर्णन किंवा व्यक्तिला मोहात पाडण्यासाठी ‘RIZZ’ लोकप्रिय संकल्पना वापरल्याचे म्हटले आहे. या संदर्भातील वृत्त ‘द हिंदू’ने दिले आहे. (Word Of The Year 2023)
‘द हिंदू’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रकाशक तज्ज्ञांच्या निर्णयामध्ये ‘रिझ’(RIZZ) शब्दांसह स्विफ्टी (Swiftie-टेलर स्विफ्टचा उत्साही चाहता), परिस्थितीजन्य (situationship-अनौपचारिक रोमँटिक किंवा लैंगिक संबंध) आणि प्रॉम्प्ट (Prompt-कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यक्रमाला दिलेली सूचना) हे देखील शब्द समाविष्ट करण्यात आले आहेत. (Word Of The Year 2023)
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने सार्वजनिक मतदानाद्वारे चार विजेत्यांची सोमवारी घोषणा केली. तसेच या विजेत्यांनी निर्मिती केलेल्या या चार शब्दांचा ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. Rizz हा शब्द हिंदीतील करिश्मा या शब्दाच्या मध्यातून आला आहे असे मानले जाते. याचा ‘Rizz Up’ (एखाद्याशी गप्पा मारणे) हे क्रियापद म्हणून देखील वापरले जाते, असे प्रकाशनाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे. (Word Of The Year 2023)
Word Of The Year 2023: डिक्शनरीमध्ये या 8 शब्दांचा नव्याने समावेश
न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, 2023 साठी ‘रिझ’ हा शब्द वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून निवडला गेला आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्येही त्याचा समावेश करण्यात आला आहे. वर्ड ऑफ द इयरच्या यादीमध्ये रिज – सिच्युएशनशिप, स्विफ्टी, प्रॉम्प्ट, सीड फ्लॅग, डी-इंफ्लुएंसिंग, हीट डोम आणि पॅरासोशियल यासह 8 शब्दांचा समावेश आहे. 2200 कोटी शब्दांच्या विश्लेषणाच्या आधारे हे आठ शब्द निवडण्यात आले आहेत. हे शब्द 2023 मध्ये झालेले सामाजिक बदल आणि ट्रेंड दर्शवतात. 2022 मध्ये, ऑक्सफर्डने गोब्लिन मोडला वर्षातील शब्द म्हणून निवडले.
हेही वाचा:

Ganguly on Kohli : सौरव गांगुलीचे कोहलीबाबत मोठे वक्तव्य, म्हणाला; ‘मी विराटला कर्णधारपदावरून हटवले नाही, त्याने…’
Cyclone Michaung Update : मिचौंग चक्रीवादळाचा तडाखा; चेन्नईमध्ये मृतांची संख्या १२ वर
Bidri Sakhar Karkhana Election : पहिल्या फेरीत भुदरगड गट क्र. ५, ६ मधून के. पीं.ना मताधिक्य; आबिटकर गट पिछाडीवर

The post ‘RIZZ’ हा यावर्षी ऑक्सफर्ड डिक्शनरीत समाविष्ट केलेला सर्वोत्तम शब्द appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने वर्ड ऑफ द इयर म्हणून ‘रिझ’(RIZZ) हा नवीन शब्द समाविष्ट केला आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने एखाद्याला व्यक्तीला आकर्षित करण्याच्या क्षमतेचे वर्णन किंवा व्यक्तिला मोहात पाडण्यासाठी ‘RIZZ’ लोकप्रिय संकल्पना वापरल्याचे म्हटले आहे. या संदर्भातील वृत्त ‘द हिंदू’ने दिले आहे. (Word Of The Year 2023) ‘द हिंदू’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे …

The post ‘RIZZ’ हा यावर्षी ऑक्सफर्ड डिक्शनरीत समाविष्ट केलेला सर्वोत्तम शब्द appeared first on पुढारी.

Go to Source