ब्रेकिंग : करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह यांची गोळ्या झाडून हत्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे ( Karni Sena )अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी (Sukhdev Singh ) यांची आज (दि.५ ) दुपारी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे.
राजस्थान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूरमधील शामनगर परिसरात सुखदेव सिंह यांचे घर आहे. आज दुपारी १.४५ च्या सुमारासह ते घराबाहेर उभे होते. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्यावर अंदाधूंद गोळीबार केला. त्यांना यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी स्पष्ट केले. या घटनेच्या वेळी सुखदेव सिंह सोबत असलेले अजित सिंह हेही या गोळीबारात जखमी झाले आहेत. (Karni Sena )
प्राथमिक माहितीनुसार, राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे ( Karni Sena )अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडीयांच्या घरात चार जण घुसले. त्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्याचा एक सुरक्षा कर्मचारी आणि अन्य एकजण गोळीबारात जखमी झाला. गाेळीबारानंतर हल्लेखाेर घटनास्थळावरुन पसार झाले, अशी माहिती राजस्थानचे पोलिस महासंचालक उमेश मिश्रा यांनी ‘पीटीआय’शी बोलताना दिली.
UPDATE | Rashtriya Rajput Karni Sena chief Sukhdev Singh Gogamedi shot dead by unidentified assailants: Jaipur police commissioner https://t.co/vOu5oNV1mz pic.twitter.com/N9DTB2whqM
— Press Trust of India (@PTI_News) December 5, 2023
हेही वाचा :
Assembly Election Result : कौन बनेगा मुख्यमंत्री! राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडकडे सर्वांच्या नजरा
Rajasthan Politics : राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाचा ‘पेच’ कायम !, ७० आमदारांचा पाठिंबा असल्याचा वसुंधराराजेंच्या समर्थकांचा दावा
I.N.D.I.A bloc Meeting : इंडिया आघाडीची उद्या होणारी बैठक रद्द; प्रमुख नेत्यांच्या अनुपलब्धतेमुळे निर्णय
The post ब्रेकिंग : करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह यांची गोळ्या झाडून हत्या appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे ( Karni Sena )अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी (Sukhdev Singh ) यांची आज (दि.५ ) दुपारी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. राजस्थान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूरमधील शामनगर परिसरात सुखदेव सिंह यांचे घर आहे. आज दुपारी १.४५ च्या सुमारासह ते घराबाहेर उभे होते. यावेळी …
The post ब्रेकिंग : करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह यांची गोळ्या झाडून हत्या appeared first on पुढारी.
