पुढारी ऑनलाईन डेस्क: बंगालच्या उपसागरावर तयार झालेले चक्रीवादळ ‘मिचौंग’ मंगळवारी आंध्र प्रदेशातील बापटला समुद्रकिनाऱ्यावर धडकण्यापूर्वी तीव्र चक्री वादळात रूपांतरित झाले आहे. पुढील दोन तासांत हे चक्रीवादळ आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर बापटलाजवळ धडकण्यास सुरूवात होणार आहे, अशी माहिती आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहापात्रा यांनी दिली आहे. (Cyclone Michaung)
‘मिचौंग’ चक्रीवादळ आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीला धडकण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. पुढील दोन तासांत आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीलगत वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रतितास ९० ते १०० किमी प्रतितास वाऱ्याचा वेग राहणार असून, या भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली आहे. Cyclone Michaung)
‘मिचौंग’ चक्रीवादळाचा तमिळनाडू, पद्दुच्चेरी आणि आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीलाफटका बसला आहे. याचा प्रभावाखाली आलेल्या चेन्नईला गेल्या दोन दिवसांपासून पावसाने झोडपले आहे. तसेच ‘मिचौंग’ चक्रीवादळ आंध्रप्रदेश किनारपट्टीला धडकण्यापूर्वी ते अतिशय तीव्र होत आहे. दरम्यान विस्कळीत हवामान प्रणालीमुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू असून, अनेक भागांत पाणी साचून, पूरस्थितीची शक्यता आहे. त्यामुळे पाणी साचलेल्या भागात बचावकार्य राबवले जात असून, नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात येत आहे, असेही माध्यमांनी स्पष्ट केले आहे. (Cyclone Michaung)
#WATCH | Dr Mrutyunjay Mohapatra, Director General, IMD says, “#CycloneMichaung will hit near Bapatla on the Andhra Pradesh coast in the next two hours. The landfall process has already started. The wind speed will be 90-100kmph. Extremely heavy rainfall to continue in AP today.… pic.twitter.com/MtG94isSE6
— ANI (@ANI) December 5, 2023
हेही वाचा:
Cyclone Michaung Update : चेन्नईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, मिचौंग चक्रीवादळाने पूरस्थिती
Cyclone Michaung Live Updates: ‘मिचौंग’ चक्रीवादळ उद्या द. आंध्रच्या किनारपट्टीला धडकणार; चेन्नईत मुसळधार पाऊस
Cyclone Michaung | ‘मिचॉन्ग’ आंध्र किनाऱ्यावर धडकणार; पीएम मोदींचे जगन मोहन रेड्डींना मदतीचे आश्वासन
The post पुढील दोन तासांत ‘मिचौंग’ चक्रीवादळ आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीला धडकणार appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क: बंगालच्या उपसागरावर तयार झालेले चक्रीवादळ ‘मिचौंग’ मंगळवारी आंध्र प्रदेशातील बापटला समुद्रकिनाऱ्यावर धडकण्यापूर्वी तीव्र चक्री वादळात रूपांतरित झाले आहे. पुढील दोन तासांत हे चक्रीवादळ आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर बापटलाजवळ धडकण्यास सुरूवात होणार आहे, अशी माहिती आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहापात्रा यांनी दिली आहे. (Cyclone Michaung) ‘मिचौंग’ चक्रीवादळ आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीला धडकण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. पुढील …
The post पुढील दोन तासांत ‘मिचौंग’ चक्रीवादळ आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीला धडकणार appeared first on पुढारी.