पिंपरी : निरक्षरांच्या सर्वेक्षणाला शिक्षकांचा असहकार
पिंपरी : प्राथमिक शिक्षकांपाठोपाठ आता माध्यमिक शाळांतील शिक्षकांनीही नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या निरक्षरांच्या सर्वेक्षणावर बहिष्कार घातला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेअंतर्गत 982 प्राथमिक शिक्षकांचा यामध्ये समावेश आहे. या शिक्षकांनी सर्वेक्षणाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शिक्षकांना निवडणूक आणि जनगणना वगळता, अन्य शालाबाह्य कामे देता येत नसल्याची तरतूद शिक्षण हक्क कायद्यात आहे; तसेच अशैक्षणिक कामांमुळे अध्यापनाला वेळ मिळत नसल्याने निरक्षर सर्वेक्षणाचे काम शिक्षकांकडून करून घेण्यात येऊ नये, असे निवेदन प्राथमिक शिक्षकांच्या विविध संघटनांनी शिक्षण संचालनालयाच्या योजना विभागाचे संचालक महेश पालकर यांना दिले होते. या वेळी निरक्षरतेचे प्रमाणाच्या नोंदी करण्यासाठी शिक्षकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालकर यांनी केले होते. मात्र, शिक्षकांनी यास नकार देत, या कामावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली.
गेल्या दहा वर्षांत शिक्षकांसह कर्मचारी भरती न झाल्याने अनेक माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांची कमतरता आहे. उपलब्ध शिक्षकांकडूनच अध्यापनाचे कार्य करून घेतले जात आहे. परिणामी शिक्षकांवर अध्यापनाचा ताण असून, सर्वेक्षणाच्या कामामुळे हा ताण आणखी वाढणार आहे.
आमचा या सर्वेक्षणाला पूर्वीपासूनच नकार आहे. आम्ही या मोहिमेवर बहिष्कार घातला आहे. शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा ताण असल्याने शासनाने हे काम दुसर्या संस्थेकडून करून घ्यावे, अशी आमची मागणी आहे.
– संजय येणारे (अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड प्राथमिक शिक्षक संघ)
हेही वाचा
अंजीर उत्पादनाला बसणार फटका
Pimpri News : दिव्यांग मतदार नावनोंदणीस प्रतिसाद
Pimpri News : स्वस्त धान्य दुकानांतील ‘ई-पॉस’ची कासवगती
The post पिंपरी : निरक्षरांच्या सर्वेक्षणाला शिक्षकांचा असहकार appeared first on पुढारी.
पिंपरी : प्राथमिक शिक्षकांपाठोपाठ आता माध्यमिक शाळांतील शिक्षकांनीही नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या निरक्षरांच्या सर्वेक्षणावर बहिष्कार घातला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेअंतर्गत 982 प्राथमिक शिक्षकांचा यामध्ये समावेश आहे. या शिक्षकांनी सर्वेक्षणाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शिक्षकांना निवडणूक आणि जनगणना वगळता, अन्य शालाबाह्य कामे देता येत नसल्याची तरतूद शिक्षण हक्क कायद्यात आहे; तसेच अशैक्षणिक …
The post पिंपरी : निरक्षरांच्या सर्वेक्षणाला शिक्षकांचा असहकार appeared first on पुढारी.