विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! पुण्यात स्कूल बस झाडाला धडकून अपघात

वाघोली : पुण्यातील वाघोली येथे आज रायझिंग स्टार या स्कूलची बस झाडावर आदळल्याने भिषण अपघात झाला असून यामध्ये बसमधील काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी विद्यार्थ्यांवरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून बस झाडावर आदळल्याने हा अपघात झाला आहे. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडून आल्याचे व्हीडीओ फुटेजवरून दिसून येत आहे.
या अपघाताने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे पालकांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झालेले दिसून येत आहे. बसवरती आरटीओचे नियंत्रण नसल्याचा आरोप पालकवर्गाकडून केला जात आहे. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहे.
हेही वाचा
GTA 6 चा ट्रेलर वेळेआधी रिलीज, नव्या गेम प्लेची झलक पाहा
Pune News : तोरणा खोर्यातील आरोग्य सेवा ठप्प
खडकवासला मेट्रो मार्गासाठी पाहणी : आमदारांची अधिकार्यांशी चर्चा
The post विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! पुण्यात स्कूल बस झाडाला धडकून अपघात appeared first on पुढारी.
वाघोली : पुण्यातील वाघोली येथे आज रायझिंग स्टार या स्कूलची बस झाडावर आदळल्याने भिषण अपघात झाला असून यामध्ये बसमधील काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी विद्यार्थ्यांवरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून बस झाडावर आदळल्याने हा अपघात झाला आहे. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडून आल्याचे व्हीडीओ फुटेजवरून दिसून येत आहे. …
The post विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! पुण्यात स्कूल बस झाडाला धडकून अपघात appeared first on पुढारी.
